जिओची मोफत इंटरनेट आणि कॉल सेवा आता संपली आहे, ज्या ग्राहकांनी १५ एप्रिलच्या आधी जिओ प्राईममध्ये ९९ रुपये भरून नोंदणी केली आहे तसेच ३०९ किंवा ५०९ रुपयांचा रिचार्ज केला आहे त्यांना कंपनीने देऊ केलेल्या सवलतींचा लाभ घेता येणार आहे. जिओच्या वेबासाईटवर लॉगिन केल्यानंतर प्रीपेड मोबाईल धारकांसाठी काही प्लान आहेत. पण पोस्टपेड धारकांसाठी काय प्लान आहेत हे मात्र यावर दिलेले नाही. तेव्हा जिओचे टेरिफ रेट्स आणि प्लान यापुढे काय असतील याबद्दल थोडक्यात.
* ३०९ रुपयांच्या रिचार्जवर दरदिवशी १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स, आणि दिवसाला १०० एसएमएस मोफत मिळणार आहेत. या पॅकची वैधता असणार आहे ८४ दिवसांची. त्यानंतर ३०९ रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर दिवसाला १ जीबी मोफत डेटा मिळणार असून या प्लानची वैधता २८ दिवसांपर्यंतच असणार आहे.

* ५०९ रुपयांचे रिचार्ज केलेल्या ग्राहकांना ८४ दिवसांसाठी १६८ जीबी डेटा मोफत मिळणार आहे, म्हणजेच दरदिवशी ग्राहक २ जीबी डेटा वापरू शकतात. पण त्याचबरोबर मोफत कॉलिंग आणि इतर सुविधांचाही लाभ त्यांना मिळणार आहे.
* यात सगळ्यात स्वस्त प्लान आहे १४९ रुपयांचा. यामध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा, २०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळणार आहे.
* पण जे ग्राहक समर सप्राईज अंतर्गत येतात आणि ज्यांनी ३०३ रुपयांचा रिचार्ज केला आहे त्यांना पुढचे तीन महिने तरी मोफत सेवांचा लाभ घेता येणार आहे.
* ज्यांना सर्वाधिक इंटरनेट वापरण्याची सवय आहे त्यांच्यासाठी डेटा बुस्टर प्लान आहेत. हे ११ रुपयांपासून सुरू होऊन ३०१ रुपयांपर्यंत आहेत.
११ रुपयांच्या रिचार्जवर ०.१ जीबी डेटा
५१ रुपयांचा रिचार्जवर १ जीबी डेटा
९१ रुपयांचा रिचार्जवर २ जीबी डेटा
२०१ रुपयांच्या रिचार्जवर ५ जीबी डेटा
३०१ रुपयांच्या रिचार्जवर १० जीबी पर्यंत डेटा ग्राहकाला मिळणार आहे, पण या प्लानला कालमर्यादा नाही.

* प्राईम युजर्ससाठी सगळ्यात स्वस्त असा १९ रुपयांचा एक दिवसांची वैधता असणारा प्लान देखील आहे. ज्यामध्ये २०० एमबी डेटा, १०० एसएमएस, मोफत वॉईस कॉल्स यासारख्या सुविधा मिळणार आहे, तर ज्यांनी प्राईम मेंबरशिप घेतली नाही त्यांना मात्र १०० एमीबी डेटा १९ रुपयांचा रिचार्ज केल्यावर मिळणार आहे.