मुलींनी लग्नाला नकार दिल्यामुळे त्यांना जबरदस्ती पळवून नेल्याच्या घटना सतत घडत असतात. सध्या अशीच एका घटना समोर आली असून मुलीला पळवून नेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलीने लग्नाला नकार दिल्याने तिला दोन व्यक्ती जबरदस्तीने तिच्या राहत्या घरातून पळवून नेत असल्याचे दिसत आहे. अपहरणाची घटना मुलीचा १८ वा वाढदिवस झाल्यानंतर घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना रशियातील असून स्थानिक प्रसारमाध्यमांनी ‘वधू-चोरी’ म्हणून या अपहरणाच्या घटनेला दाखवलं आहे. कारण, रशियाच्या अनेक भागात आजही ही जुनी परंपरा सुरु असल्याचं सांगितलं जातं. तर अपहरण झालेल्या १८ वर्षीय बेला रवोयन हीने २० वर्षीय अमिक शमोयन याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. मात्र, “अमिक बेलावर प्रेम करत असल्यामुळे त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं, त्यामुळे त्यानेच मुलीचे अपहरण केलं” अशी माहिती एका व्यक्तीने gazeta.ru शी बोलताना सांगितलं.

हेही पाहा –Viral Video: हजारो लोकांसमोर लाइव्ह सूरु असताना कोरियन महिलेची मुंबईत छेडछाड, बळजबरीने जवळ ओढलं अन्…

बेला बेपत्ता झाल्याप्रकरणी तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आरोपी अमिक शमोयन याला अटक करण्यात आली असून, अमिकचे वडील आणि भाऊदेखील वॉन्टेड लिस्टमध्ये आहेत. अमिकला पोलिस कोठडीत घेऊन त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती रशियन तपास समितीने दिली आहे.

बेलाने सांगितला घटनेचा थरार –

बेलाने तिचं अपहकरण केल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. तिने सांगितले की, “माझे अपहरण करून ‘निझनी नोव्हगोरोड’ भागात नेण्यात आलं. मात्र, काही दिवसांनंतर स्वत:च अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. शिवाय गुंडाच्या तावडीतून सुटका करुन घेताच तिने पोलिस स्टेशन गाठत घटनेची सर्व माहिती पोलिसांना दिली.”

बेलाच्या वडिलांनी दाखवली बंदूक –

हेही वाचा- बापरे! सरकारी रुग्णालयात वर्षभरापासून बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करणारी डॉक्टर निघाली १० वी पास

या घटनेशी संबंधित आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये बेलाच्या वडिलांनी अपहरणकर्त्यां आरोपीच्या कुटुंबीयांकडून चालवण्यात येत असलेल्या कॅफेमध्ये जात बंदूक रोखली. मात्र, त्यांनी गोळीबार केला नसल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

प्रकरणाचा तपास सुरू –

अपहरणाच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरिदेखील ही घटना नेमकी कशामुळे घडली? त्यामागचं कारण काय होतं? याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवाय बेलाच्या वडिलांनी तिचं लग्न एका श्रीमंत मुलाशी करुन द्यायचं होतं. असा दावा केला जात आहे. तर या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरु आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia news kidnapping of girl for refusing marriage video viral jap
First published on: 01-12-2022 at 19:54 IST