कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना आपला पुढचा प्लॅन काय आहे याचा खुलासा सार्वजनिकरित्या न करता, तो प्लॅन यशस्वी झाल्यानंतरच त्याबाबत खुलासा करावा असं म्हटलं जातं. मात्र, आपल्या पुढच्या नियोजनाचा केवळ बोभाटा केल्याने त्याचा किती फटका बसू शकतो याचं एक उदाहरण आता समोर आलं आहे. आपल्या केपनीच्या भविष्यातील योजनेचा बोभाटा केल्यामुळे अमेरिकेतील एक तरुण अब्जाधीश रातोरात एक लाख २८ हजार कोटी संपत्तीहून थेट शून्यावर आला आहे.

सॅम बँक्समन फ्रायड असं या अब्जाधीशाचे नाव आहे. सॅम हा एफटीएक्स (FTX) कंपनीचा सीईओ असून तो रातोरात कंगाल झाला आहे. त्याच्या संपत्तीमध्यये एका दिवसात सुमारे ९४ टक्क्यांनी घसरण झाली असून त्याच्या संपत्तीमध्ये ९९१.५ मिलियन डॉलर इतकी घसरण झालेय. सॅम हा १५.२ अब्जचा मालक होता. एका अहवालानुसार, एका दिवसात कोणत्याही अब्जाधीशांच्या संपत्तीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. तुमच्या माहितीसाठी १६ बिलियन डॉलर्स म्हणजेच तब्बल (१२,८८,७७,०४,००,००० रुपये) एवढी रक्कम असते. त्यामुळे या तरुणाचे किती नुकसान झालं असेल याचा अंदाज आपण लावू शकतो.

400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?

आणखी वाटा- Zomato डिलीवरी बॉयने भररस्त्यातच सुरू केला डान्स; नेटकऱ्यांनी केली चिंता व्यक्त, म्हणाले ‘आम्हाला वाटले…’

सॅम का झाला कंगाल ?

३० वर्षीय सॅमच्या नशिबात हा आर्थिक भूकंप आला कारण त्याने आपल्या क्रिप्टो एक्सचेंज FTX कंपनीचे शेअर त्यांचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या बिनांस (Binance) हा विकत घेणार असल्याचे त्याने सार्वजनिकरित्या जाहीर केलं. त्यामुळे त्याच्यावरती कंगाल होण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, एका ट्विटमध्ये जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म Binance चे प्रमुख चांगपेंग झाओ यांनी सांगतिलं की, आपण FTX खरेदी करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली असून, सध्या छोटे क्रिप्टो एक्सचेंज हे रोखीच्या संकटातून जात आहे. शिवाय करार जाहीर करुन हे महाशय थांबले नाहीत तर त्यांनी या ट्विटमध्ये दोन गुंतवणुकीचे मंत्रही शेअर केले आणि त्यामुळेच करोडपतीवर रोडपती होण्याची वेळ आली असल्याचं बोललं जात आहे.

आणखी वाचा- बिर्याणीवरून ग्राहकांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला केली मारहाण; CCTV Viral झाला आणि…; पाहा नेमकं काय घडलं

दरम्यान, एक्स्चेंजच्या विक्रीची माहिती मिळताच गुंतवणूकदारांनी भितीने आपले हात आखडते घेतल्यामुळेच या सॅमची संपत्ती एका दिवसात १६ अब्ज डॉलरवरून सुमारे एक अब्ज डॉलरवर आली आहे. एका अहवालानुसार FTX विक्रीची बातमी येण्यापूर्वी सॅम बँकमन-फ्रॉइडची एकूण संपत्ती १५.२ अब्ज इतकी होती. एका रात्रीत त्यांची संपत्ती १४.६ अब्ज डॉलरने कमी झाली.

एकीकडे एवढ्या मोठं आर्थिक नुकसान झालेल्या सॅमच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीये कारण त्यांच्या भागदारकांसाठी, सिक्युरिटीज नियमांचे संभाव्य उल्लंघन केल्याबद्दल यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनद्वारे बँकमन-फ्राइडची चौकशी केली जात असल्याची माहिती देखील समोर आली आहे.