scorecardresearch

Premium

…आणि सौदी अरेबियामध्ये पहिल्यांदाच महिला अँकरने दिल्या रात्रीच्या बातम्या

महिला अँकर आणि त्यांच्या बातम्या ही आपल्या देशात किंवा जगातही फार कौतुकाची गोष्ट नाही. खरं तर न्यूज चॅनेलवर महिला अँकरच जास्त असतात. पण सौदी अरेबियासारख्या देशासाठी मात्र महिला अँकरने बातम्या देणे ही गोष्ट खूपच आश्चर्याची आहे. यातही महिला म्हटल्यावर तिने सकाळच्या वेळेतील बातम्या देणे ठिक आहे. पण रात्रीच्य बातम्या महिलांनी देणे याठिकाणी काहीसे वेगळे मानले […]

…आणि सौदी अरेबियामध्ये पहिल्यांदाच महिला अँकरने दिल्या रात्रीच्या बातम्या

महिला अँकर आणि त्यांच्या बातम्या ही आपल्या देशात किंवा जगातही फार कौतुकाची गोष्ट नाही. खरं तर न्यूज चॅनेलवर महिला अँकरच जास्त असतात. पण सौदी अरेबियासारख्या देशासाठी मात्र महिला अँकरने बातम्या देणे ही गोष्ट खूपच आश्चर्याची आहे. यातही महिला म्हटल्यावर तिने सकाळच्या वेळेतील बातम्या देणे ठिक आहे. पण रात्रीच्य बातम्या महिलांनी देणे याठिकाणी काहीसे वेगळे मानले जाते. मात्र एका महिला पत्रकाराने नवा इतिहास रचला असून या देशात महिलाही रात्रीच्या न्यूज अँकरींगचे काम करु शकतात हे सिद्ध करुन दाखवले आहे. पहिल्यांदा राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या सौदी टीव्ही या न्यूज चॅनेलवर रात्रीच्या बुलेटीनमध्ये या महिला अँकरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मात्र हे बुलेटीन तिने एकटीने दिले नाही तर त्यावेळी तिच्यासोबत एक पुरुष सहकारीही होता. रात्री ९.३० च्या बातम्या देत सौदी अरेबियातील माध्यमात एक इतिहास रचला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Saudi arabia female news anchor presents evening newscast first time

First published on: 26-09-2018 at 18:50 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×