scorecardresearch

‘हो जायेगी बल्ले बल्ले’ गाण्यावर शिक्षिकेचा जबरा डान्स, विद्यार्थ्यांनाही भन्नाट नाचवलं, Video होतोय व्हायरल

भर वर्गातच शिक्षिकेनं भन्नाट डान्स केल्यावर विद्यार्थीही थिरकले, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क.

‘हो जायेगी बल्ले बल्ले’ गाण्यावर शिक्षिकेचा जबरा डान्स, विद्यार्थ्यांनाही भन्नाट नाचवलं, Video होतोय व्हायरल
शिक्षिकेचा भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल- (Image-Instagram)

Teacher And Student Dance Video Viral : गेल्या काही दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. हर हर शंभू, पतली कमरीया मोरी या गाण्यावर महिला शिक्षकांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओही इंटरनेटवर प्रचंड गाजला. नेटकऱ्यांना त्या गाण्याचं वेड लागलेलं असतानाचा आता पुन्हा एकदा नव्या व्हिडीओची चर्चा रंगू लागली आहे. एका शिक्षिकेनं भर वर्गातच भन्नाट डान्स सुरु केल्यानंतर विद्यार्थ्यांनीही ठुमके मारायला सुरुवात केली. शिक्षिकेनं केलेला जबरा डान्स पाहून संपूर्ण वर्गातील विद्यर्थीही हो जायेगी बल्ले बल्ले या गाण्यावर थिरकू लागले. शिक्षिका आणि विद्यार्थ्यांच्या हा जबरदस्त डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

शिक्षिकेचा भन्नाट डान्स पाहून विद्यार्थ्यांनाही डान्सचा मोह आवरला नाही अन्….

शिक्षिकेचा हा डान्सचा व्हिडीओ chaudharymuskan26 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनुष्का चौधरी असं या इन्स्टाग्राम युजरचं नाव आहे. व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत ५४ हजारांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. दलेर मेहंदी यांच्या ‘हो जायेगी बल्ले बल्ले’ या लोकप्रिय गाण्यावर या शिक्षिकेनं जबरदस्त डान्स करत शाळेतील विरद्यार्थ्यांनाही भन्नाट नाचवल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. विद्यार्थी आणि शिक्षिका गाण्याचे बोल सुरु झाल्यावर जबरदस्त ठुमके लगावताना दिसत आहे. शाळेच्या वर्गात विद्यार्थी आणि शिक्षिका थिरकल्याचे संपूर्ण दृष्य कॅमेरात कैद झाले असून व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनाही या गाण्याची भुरळ पडली आहे.

नक्की वाचा – लग्नमंडपात झोपून ‘अंग लगा दे’ गाण्यावर थिरकली, पाकिस्तानच्या या तरुणीची चर्चा का होतेय? पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “गाण्यांच्या शाळेत आल्यावरचा जोश”. दुसरा नेटकरी म्हणाला, “माझ्या बालपणात अशीच शिक्षिका असायला हवी होती.” अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, ” तुम्ही तुमची ड्यूटी चांगल्या पद्धतीने करत असल्यामुळं खूप साऱ्या शुभेच्छा.” “शाळेतील वर्गाचा निष्कर्ष लावण्याचा हा उत्तम मार्ग आहे मॅडम.”, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं. शाळेतील हा डान्स व्हिडीओ इंटरनेटवर गाजला असून हजारो नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. तर काहींनी शिक्षिकेवर शाळेतील वर्गात डान्स केल्यानं जोरदार टीकाही केल्याचं प्रतिक्रियांच्या माध्यमातून समोर आलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-01-2023 at 18:44 IST

संबंधित बातम्या