थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनुसार एक एक रुपया महत्त्वाचा असतो. एक एक रुपया जमा करून लाखो रुपये जमा होतात. असंच एका व्यक्तीने एक एक रुपया जमा करून स्कूटर घेण्यासाठी आवश्यक रक्कम जमा केली. ही व्यक्ती आसाममध्ये राहणारी असून गाडी विकत घेण्यासाठी सुझुकी शोरुममध्ये गेला होता. इतकी चिल्लर पाहून शोरुममधील स्टाफला घाम फुटला. पण शेवटी आणलेली रक्कम बरोबर असेल तर गाडी तर द्यावीच लागणार होती. मग काय बसले चिल्लर मोजायला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हिरक दास नावाच्या युट्युबरने त्याच्या चॅनलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात दास बोलत आहे की, आज एक व्यक्ती आसाममधील बारपेटा येथील सुझुकी डीलरशिपवर स्कूटर घेण्यासाठी आली आहे. यातून आपण शिकले पाहिजे की तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैशांची गरज असते आणि थोडी बचतही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकते. हा व्हिडीओ एका छोट्या स्टेशनरीचे दुकान चालवणाऱ्या व्यक्तीचा आहे. दावा आहे की त्याने ही सुझुकी स्कूटर सात आठ महिन्यांपासून चिल्लर जमा केल्यानंतर खरेदी केली आहे. व्हिडीओमध्ये पाहून कळते की या दुकानदाराने सुझुकी एवेनिस १२५ खरेदी केली आहे.

sebi makes nomination optional for joint mutual fund portfolios
संयुक्त म्युच्युअल फंड खात्यांसाठी नामनिर्देशन आता पर्यायी
Poonawala Fincorp posts highest quarterly net profit at Rs 332 crore
पूनावाला फिनकॉर्पचा ३३२ कोटींचा सर्वोच्च तिमाही निव्वळ नफा
IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार दुकानात गेलेल्या व्यक्तीने चिल्लरची गोण भरून आणली होती. ही नाणी मोजण्यासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागला. या व्हिडीओमध्ये चिल्लर मोजताना कर्मचारी दिसत आहेत. ही चिल्लर ५ बकेटमध्ये ठेवण्यात आली होती, त्यानंतर रक्कम भरल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करून स्कूटरची चावी दुकानदाराच्या ताब्यात देण्यात आली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप वेळ आणि संयम लागतो, असं नेटकरी म्हणत आहेत.