आपल्या देशातील अनेक प्रमुख महामार्ग जंगलाच्या शेजारुन किंवा जंगलातून जातात. त्यामुळे अनेकदा या रस्त्यांवरुन जाताना लोकांना वन्य प्राण्यांचा सामना करावा लागतो. अशा रस्त्यांवरुन जाताना लोक पुरेशी काळजी घेतात. ते आपल्या गाड्यांच्या काचा बंद करतात जेणेकरुन वन्य प्राण्यांनी त्यांना काही नुकसान पोहचवू नये. तर गाडीचे दरवाजे लावले आणि काचा बंद केल्यानंतर प्राणी लोकांना काही इजा करू शकत नाहीत. परंतु हत्तीसारखा भलामोठा आणि शक्तिशाली प्राणी जर या रस्त्यांवरुन जाताना दिसला तर मात्र अनेकांना भिती वाटते. कारण हत्तीच्या ताकतीचा अंदाज प्रत्येकाला आहे. हत्ती मोठमोठ्या वाहनांनाही क्षणात उचलून फेकतो. अशा वेळी एखाद्या वाहनासमोर अचानक हत्ती आला तर साहजिकच कोणीताही प्रवासी घाबरेल यात शंका नाही.

सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक आणि तितकाच मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पर्यटकांची कार जंगलातून जात असल्याचं दिसत आहे. ही कार जंगलातील रस्त्यावरुन जात असताना त्यांच्यासमोर अचानक एक मोठा हत्ती दिसतो. हत्तीला पाहताच कारमधील लोक आधी त्याचं व्हिडीओ शूटींग करायला सुरुवात करतात. पण जसजसा हत्ती त्यांच्या कारकडे यायला लागतो तेव्हा मात्र सगळे घाबरतात आणि ते देवाचा धावा करायला सुरुवात करतात. व्हिडीओत हत्ती पाहिल्यानंतर ड्रायव्हर कार रिव्हर्स गिअरमध्ये चालवायला लागतो त्याचवेळी कारमधील लोक गणपतीचा मंत्रजप करायला सुरुवात करतात. आश्चर्याची बाब म्हणजे हत्तीदेखील कारजवळ न जाता रस्त्याच्या कडेला जातो आणि प्रवाशांचा जीव भांड्यात पडतो.

हेही पाहा- विनाहेल्मेट एकाच स्कुटीवरुन ४ मुलींचा जीवघेणा प्रवास; भरधाव वेगात सेल्फी काढतानाचा Video पाहून नेटकरी संतापले

हत्तीचा व्हिडिओ व्हायरल –

हेही पाहा- Video: वाहन चालकांना शिवीगाळ, कारच्या बोनेटवर डान्स; प्रेमात फसवणूक झाली म्हणून तरुणीचा भररस्त्यात राडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेचा व्हिडिओ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तर हत्तीला पाहताच मंत्रोच्चार करणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा मजेशीर व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शमध्ये आयपीएस अधिकाऱ्याने लिहिले, “जेव्हा ब्राह्मणांची गाडी जंगली हत्तीला भेटते…” सध्या हा मजेशीर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने मंत्रोच्चाराची खरी ताकद दिसल्याचं म्हटलं आहे, तर आणखी एकाने हे खूप मजेशीर दृश्य असल्याचं म्हटलं आहे. शिवाय एका व्यक्तीने तर ड्रायव्हरच्या हुशारीमुळे हे शक्य झाल्याचं म्हटलं आहे.