scorecardresearch

निसर्गाचं ऑप्टिकल इल्यूजन पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही; या जादूई काडीचा Video होतोय Viral

‘हा व्हिडीओ ५ वेळा बघूनही विश्वास बसत नाही, पण शेवटी सत्य स्वीकारलं खरचं निसर्गामध्ये खूप वैविध्य आहे.’

निसर्गाचं ऑप्टिकल इल्यूजन पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही; या जादूई काडीचा Video होतोय Viral
निसर्गात असे अनेक वन्यजीव आहेत ज्यांच्याबद्दल आपणाला अद्यापही काही माहिती नाही. (Photo : Twitter)

निसर्गात असे अनेक वन्यजीव आहेत ज्यांच्याबद्दल आपणाला अद्यापही काही माहिती नाही. शिवाय त्या प्राण्यांना आपण पाहिलंही नाही. मात्र, या कधीही न पाहिलेल्या काही प्राण्यांना सोशल मीडियामुळे पाहणं शक्य झालं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक जंगली प्राण्यांचे व्हिडीओ आपण सहजरित्या पाहू शकतो. दररोज अशा नवनवीन प्राण्याचे हजारो व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

हेही पाहा- Video: लहान माशाच्या आमिषाने आला मोठा मासा आणि पुढे जे झालं ते पाहून म्हणाल, आमिष वाईटच…

त्यातील काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही व्हिडीओ आपले डोळे दिपवून टाकतात. ते व्हिडीओ पाहणं म्हणजे एखाद्या नेत्रदीपक अनुभवापेक्षा कमी नसते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो पाहिल्यावर निसर्गाचा अविष्कार काय असतो याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ IFS अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

हेही पाहा- झाडावर नव्हे चक्क म्हशीच्या शिंगांच्या मधोमध पक्षाने बनवलं घरटं; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक साधी काठी दिसत आहे. मात्र, काही वेळाने एक माणूस त्या काठीला हात लावताच ती हलू लागते आणि ती काठी हलल्याने एक किडा काठीवर रेंगाळताना दिसतं आहे. मात्र, या कीटकाने स्वतःला त्या काठीशी इतकं एकरुप करुन घेतलं आहे की, आपणाला तो किडा आहे हे ओळखणं फार कठीण जातं आहे. शिवाय ‘जर त्या व्यक्तीने काठी हलवली नसती तर तो किडा आहे हे कोणाच्याच लक्षात आलं नसतं’ असं नेटकरी म्हणत आहेत.

हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना कॅप्शनमध्ये ‘अतुलनीय क्लृप्ती, ही त्यांची स्वतःची संरक्षण यंत्रणा आहे.’ असं लिहिलं आहे. त्यामुळे निसर्गाने प्रत्येक कीटकाला स्वतःचं सरंक्षण करण्यासाठी काहीना काही कला दिली असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत. आयपीएस अधिकाऱ्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी निसर्गातील विविधतेचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. तसंच हा विचित्र दिसणारा कीटक पाहून लोक थक्क झाले आहेत. दरम्यान, एका व्यक्तीने कमेंटमध्ये म्हटलं आहे की, ‘हा व्हिडीओ ५ वेळा बघूनही विश्वास बसत नाहीये. पण शेवटी सत्य स्वीकारलं खरचं निसर्गामध्ये खूप वैविध्य आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 18:20 IST

संबंधित बातम्या