मुंबईतील कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये घडलेला एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे लोकांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये कुर्ल्यातील हबीब हॉस्पिटलजवळील इस्तंबूल हॉटेलमधील एक कर्मचारी नाल्यातील सांडपाण्याचा गाळ काढण्यासाठी चिकन फ्राईंग नेट वापरताना दिसत आहे. या भयानक दृश्य पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

mumbai_tv नावाच्या इंस्टाग्राम खात्यावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, हॉटलेच्या किचनमधील हा व्हिडीओ आहे. जिथे एक कर्माचारी गटारातील घाण काढण्यासाठी चिकण तळण्यासाठी वापरत आहे.व्हिडीओ शूट करत असल्याचे पाहताच तो तेथून कचरा घेऊ निघून जातो. त्यानंतर कचरापेटी जवळ दोन कर्मचारी कचरा फेकताना दिसत आहे. “

हेही वाचा – “२०२४ निवडणुकीतील सर्वोत्कृष्ट फोटो!”आनंद महिंद्रांनी शेअर केली पोस्ट, नेटकऱ्यांना झाला आनंद

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: जे लोक बाहेर जेवतात. व्हिडिओमध्ये चित्रित केलेल्या अस्वच्छ प्रथांवर अनेकांनी घृणा आणि संताप व्यक्त केला आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षेबद्दलच्या चिंता वाढल्या आहेत. मुंबईत काही दिवसांपूर्वीच शोर्मा खाल्ल्यानंतर एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या पाठोपाठ घडलेल्या घटनांमुळे शहरातील भोजनालयांमध्ये अन्न सुरक्षा मानकांची तपासणी तीव्र झाली पाहिजे अशी इच्छा लोकांकडून व्यक्त केली जात आहे.

व्हिडाओवर नेटकऱ्यांनी समीश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ही जाळी स्वयंपाकासाठी वापरली आहे का? असा प्रश्न विचारला आहे तर काहींनी उपहासात्मकपणे म्हटले की,”मल्टिपर्पज जाळी” (अनेक कामासाठी वापरली जाणारी जाळी) दुसऱ्याने लिहिले, “मुंबई पालिकाने यांचा परवाना रद्द केला पाहिजे.” तर दुसऱ्याने म्हटले,”तातडीने हॉटेल बंद करा.”

हेही वाचा – “शिंगाने जोरात दिली धडक अन्…..”, बैलाला खाऊ घालणे महिलेला पडले महागात! हल्ल्याचा थरारक Video Viral

व्हायरल व्हिडिओने खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यासाठी कठोर स्वच्छता पद्धती पाळण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आहे. अशी अपेक्षा आहे की आरोग्य अधिकारी तपास करण्यासाठी आणि अशा पद्धती प्रचलित नाहीत याची खात्री करण्यासाठी जलद कारवाई करतील. ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि त्यांनी खाद्यपदार्थांबाबत कोणत्याही अस्वच्छतेबाबत तक्रार केली पाहिजे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sewage sludge removed with chicken fry net video from mumbai hotel goes viral snk