प्राण्यांचे माणसांवर हल्ल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडीओमध्ये अनेकादा पिसाळलेले कुत्रा किंवा गाय-बैल हे माणसांवर हल्ला करताना दिसतात. भारतातील प्राण्यांचे हल्ल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असताना मेक्सिकोमधील असाच व्हिडीओ चर्चेत आला आहे. समुद्रकिनारी बैलाच्या जवळ जाणे महिलेला महागात पडले आहे. अचानक महिलेवर बैलाने हल्ला करतानाचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे,. लॉस कॅबोस, बाजा कॅलिफोर्निया सुर येथील समुद्रकिनारी ही धक्कादायक घटना घडली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिला समुद्रकिनारी बांधलेल्या एका शेडखाली बैलाला काहीतरी खायला देताना दिसत आहे. सुरुवातीला, संवाद मैत्रीपूर्ण दिसला, कारण बैलाने तिच्याकडून अन्न स्वीकारले. मात्र, जेव्हा बैल तिथे ठेवलेल्या पिशवीमधील गोष्टी खाऊ लागला तेव्हा महिलेने त्यात हस्तक्षेप करत पिशव्या उचलण्याचा प्रयत्न केला. बैलाने नकार दर्शवत हातातील पिशव्या पाडल्या आणि त्यातील अन्न खाण्यास सुरुवात केली. पण महिला तरीही पिशवी उचलण्याचा प्रयत्न करताना दिसते. समुद्र किनाऱ्यावरील इतर लोक महिलेला बैलापासून दूर जाण्याचा सल्ला देतात पण महिला त्याकडे लक्ष देत आहे. शेवटी बैल हिंसक होता आणि अचानक महिलेवर हल्ला करतो. शिंगाने जोरात धडक देऊ महिलेला थेट जमिनीवर पाडतो. महिला पळून जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा आणखी जोरात धडक देऊन तिला जवळपास उचलून पुढे फेकतो. लोक जोरजोरात ओरडून महिलेला हालचाल करू नको शांत राहा असा सल्ला देतात जे पाहून पिसाळलेला बैल शांत होतो आणि पुन्हा आपल्या पिशव्यामधील अन्न खाण्यासाठी जातो. लोक हे दृश्य भयभीतपणे पाहत होते.

हेही वाचा – “२०२४ निवडणुकीतील सर्वोत्कृष्ट फोटो!”आनंद महिंद्रांनी शेअर केली पोस्ट, नेटकऱ्यांना झाला आनंद

व्हायरल व्हिडीओमध्ये इंस्टाग्राम सोशल मीडियावर अनेक वेळा शेअर केला जात आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, बैलाबरोबर पंगा घेणे पडले महागात.

महिलेची सद्यस्थिती आणि तिला किती दुखापत झाली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडियाची प्रतिक्रिया येथे आहे:

एकाने लिहिले: “ती यासाठी पात्र आहे. काही लोक ऐकत नाहीत.”

दुसऱ्याने लिहिले: “कोणीही तिची मदत केली नाही लोक तिला बैलापासून दूर राहण्याचा सल्ला देत होते जेणेकरून ती या परिस्थितीमधून बाहेर पडू शकेल पण तिने दुर्लक्ष केले. “

हेही वाचा – पैसे कमावण्यासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट जुगाड; रिक्षाला लावले लोहचुंबक अन्…; पाहा VIDEO

तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले: “मूर्ख खेळ खेळा, मूर्ख बक्षिसे जिंका.”

समुद्र किनाऱ्यारील एका व्यक्तीला उद्देशून चौथ्या वापरकर्त्यानेलिहिले की, “सर्फबोर्ड घेऊन जाणरा व्यक्ती कोणताही धोका पत्करत नाही