उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमी सोशल मीडियावर काही नाही काही शेअर करत असतात. सध्या त्यांनी निवडणुकीच्या काळातील ऐतिहासिक क्षण साजरा करणारी एक पोस्ट शेअर केली. व्हायरल पोस्टमध्ये एका आदिवासी मतदाराचा त्यांचे मतदार कार्ड हातात धरलेला आणि तर्जनीला शाई लावलेले फोटो शेअर केले आहेभारतातील विशेषत: असुरक्षित आदिवासी गटांपैकी एक (PVTGs) शॉम्पेन जमातीच्या नागरिकाने प्रथमच मतदान केले आहे.

मतदान हा लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे नागरिकांना मतदान करण्याचे आव्हान केले जाते. दरम्यान, आनंद महिंद्रा X वर पहिल्यांदा मतदान करणाऱ्या आदिवासी व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “ग्रेट निकोबारमधील सातपैकी एक शॉम्पेन जमातीतील व्यक्तीने प्रथमच मतदान केले आहे. लोकशाहीबरोबर जोडले जाणे हे एक न थांबवता येणारी शक्ती आहे. ” महिंद्रा यांनी “२०२४ च्या निवडणुकीतील सर्वोत्तम फोटो असेही म्हटले आहे.

आता, इंटरनेट या सर्वात सुंदर फोटोवर प्रतिक्रिया देत आहे.

एकाने लिहले की, “आजच्या दिवसातील सर्वोत्तम फोटो. जगातील सर्वात मोठी लोकशाही तुम्हाला मतदानाचा सर्वात मोठा अधिकार देते.

दुसऱ्याने म्हटले “सर ही फोटो पाहून माझे हृदय आनंदाने भरून आले,” तर दुसऱ्याने पुढे म्हटले, “खरंच, हे त्या दिवसाचे सर्वोत्तम चित्र आहे. उत्तम झाले.”

“प्रेरणादायी” असे आणखी एकाने म्हटले

हेही वाचा – नव्या कोऱ्या बाईकला आग; तरुण गाडी बाजूला करायला गेला अन् २ सेकंदात झाला स्फोट, थरारक VIDEO व्हायरल

एका वापरकर्त्याने सांगितले की, “आमच्या वैविध्यपूर्ण देशातील लोकशाहीचा उत्सव साजरा करणारा हा एक उत्कृष्ट फोटो आहे,” असे सांगून ते पुढे म्हणाले की, “निवडणूक प्रक्रियेत त्यांना पटवून देण्यासाठी प्रशासनाच्या वेदनांची नागरिक कल्पनाही करू शकत नाहीत, एक मोठे आलिंगन आणि आपले स्वागत आहे. मुख्य प्रवाहावर विश्वास ठेवणारे लोक, आपण त्यांना निराश करू नये.”

ग्रेट निकोबार बेटाच्या घनदाट उष्णकटिबंधीय पावसाच्या जंगलात राहणाऱ्या सात जमातीपैकी शॉम्पेन जमातीतील व्यक्तीने प्रथमच १९ एप्रिल रोजी अंदमान आणि निकोबार लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान करून निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला. मतदान करा, परंतु त्यांनी ‘शॉम्पेन हट’ नावाच्या मतदान केंद्र ४११ वर फोटो काढण्यात आला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ही फोटो शेअर केली आहेत.

हेह वाचा – “८ दिवसात संपवा १० किलो गव्हाचे पीठ”, तक्रार करणाऱ्या ग्राहकाला झेप्टोने दिले हे उत्तर, शेवटी मागितली माफी

२०११ च्या जनगणनेनुसार, शॉम्पेन जमातीची अंदाजे लोकसंख्या २२९ होती. मुख्य निवडणूक अधिकारी बी.एस. जगलान यांनी पीटीआयला सांगितले की, “मतदारांना “इव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीचे प्रशिक्षण प्रशिक्षकाद्वारे देण्यात आले आहे.” “ते जंगलातून बाहेर आले आणि पहिल्यांदाच मतदान केले हे पाहून आनंद झाला,” तो पुढे म्हणाला.