Accident Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की अंगावर काटा येतो. रस्ता ओलांडताना अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. अनेकदा लहान मुले रस्ता ओलांडताना नीट बघत नाही. त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये भरधाव वेगाने धावणारी कार पायी चालणाऱ्या कुटूंबातील तीन जणांना धडक देताना दिसत आहे. हा अपघाताचा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. हा व्हिडीओ नेमका कोणत्या शहरातील आहे, याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही.

या व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका कुटूंबातील दोन महिला आणि एक चिमुकली झेब्रा क्रॉसिंगवरुन रस्ता ओलांडत आहे. अचानक भरधाव कार येते आणि या पायी चालणाऱ्या कुटूंबातील तिघांनाही उडवते. या कार चालकाचे वेगावर नियंत्रण नसते त्यामुळे हा अपघात घडतो. हा अपघात पाहून तेथील लोक मदतीला धावतात त्यानंतर व्हिडीओ संपतो. या कुटूंबासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा थरारक अपघात सीसीटिव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे.

passenger gold Jewellery worth rs 2 75 lakh stolen in bus traveling in a konduskar travels from kalyan
कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Suddenly the Truck overturned and all the bikes fell down on the road
अचानक ट्रक आडवा आला अन् रस्त्यावरील सर्व दुचाक्या धाडकन् आपटल्या, Video पाहून येईल अंगावर काटा
top ten Car Accessories Perfect Way To Customize Your Vehicle
Car Accessories : ड्रायव्हिंगसाठी ‘या’ १० ॲक्सेसरीज ठरतील बेस्ट; स्वस्तात होईल काम, प्रवासातील अडचणी होतील झटक्यात दूर
Doctors of Paral Wadia Hospital succeeded in removing a tangle of hair from a 10 year old girl stomach Mumbai
मुलीच्या पोटातून काढला केसांचा गुंता; वाडिया रुग्णालयात यशस्वी उपचार
india s First Female F1 Racer salva marjan marathi news
साल्वा मार्जन… भारतातली पहिली एफ-१ रेसर
Two lions trying to attack a dog running with the speed
थरारक! वाऱ्याच्या वेगाने धावून दोन सिंहांचा श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न; पुढे असं काही घडलं…, VIDEO पाहून अंगावर येईल काटा
gang, police, Pune, gang attacked police,
पुणे : किरकोळ कारणातून टोळक्याकडून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला

हे कुटूंब झेब्रा क्रॉसिंगवरुन रस्ता ओलांडताना दिसत आहे. हे झेब्रा क्रॉसिंग रस्ता ओलांडण्यासाठी असते. झेब्रा क्रॉसिंग दिसताच चालकाला वेग कमी करावा लागतो. चालकांनी नेहमी पायी चालणाऱ्या म्हणजेच पादचाऱ्यांना रस्ता द्यावा पण हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

हेही वाचा : Mumbai : बेस्टच्या बसला पडलेला खड्डा पाहून प्रवासीने कंडक्टरला विचारले, कंडक्टर न बोलता फक्त…; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

GoreFights या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एका कारने कुटूंबाला धडक दिली” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. काही युजर्सनी कार चालकावर रोष व्यक्त केला आहे तर काही युजर्सनी या कुटूंबाची चूक असल्याचे लिहिलेय आहे. एका युजरने लिहिलेय, “रस्ता ओलांडण्यापूर्वी कुटूंबाने नीट पाहायला पाहिजे होते”