Shocking video: तसे तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. पण हा एक असा व्हिडीओ, जो पाहिल्यावर तुम्हाला धडकी भरेल. ड्रायव्हिंग करता करता रस्त्यात असं काही घडलं की तुमच्या अंगावर काटा येईल. २५ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. ज्यातील ५ सेकंद भयंकर आहेत. असं नेमकं काय घडलं ते पाहुयात.पुढे रस्ता मोकळा आहे. त्यामुळे कारचालक सुसाट आहे. व्हिडीओ सुरू होऊन पाच सेकंद सुरू होत नाही तोच…असं काही घडतं की कुणी विचारही केला नव्हता.

‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येक हायवेवर वाचलं आहे. कारण वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरुप घरी पोहोचलेलं बरं, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरी देखील काही मंडळी या सल्लाकडे दुर्लक्ष करतात. अन् पुढे याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागते. याचिच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. कितीही अनुभवी ड्रायव्हर असला तरी घाटात गाडी चालवणे म्हणजे रिस्क आलीच. कधी कोणतं वळण येईल आणि थेट गाडी दरीत जाईल याचा नेम नसतो. त्यामुळे घाटात गाडी सावकाश चालवण्याचा सल्ला दिला जातो.

मात्र काहीजण याकडे दुर्लक्ष करुन स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात घालतात. अशाच एका ट्रक चालकाने घाटात अतिशय वेगात ट्रक चालवत स्वत:चा जीव धोक्यात घातला अन् त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. घाटात वळण घेताना वेगावर निंयत्रण न आल्यानं ट्रक पलटी झाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “सरकार कोणतंही असो…” लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर टेम्पोमागची पाटी व्हायरल; पाहून पोट धरुन हसाल

घटनेनंतर घाटात वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने वाहन बाजूला केली. त्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. यापूर्वी या घाटात अशा प्रकारचे अपघात झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या व्हिडीओवर अनेकजण संताप व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत.