महाराष्ट्रात श्रावण महिन्याला आजपासून सुरूवात झालेली आहे. श्रावण महिन्याला खूपच पवित्र महिना मानण्यात आले आहे. भगवान शंकराने समुद्रमंथनातून बाहेर पडलेले विष प्राशन करून मनुष्य जातीवरील संकट दूर केले, असं सांगितलं जातं. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी विशेष व्रत केले जाते. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा मोठ्या भक्तीभावाने केली जाते. आतापर्यंत तुम्ही अनेक टिव्ही मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये शंकर देवाची रूपे पाहिली असतील. पण सध्याच्या आधुनिक युगात शंकर देव प्रकटले तर? हे वाचून सुरूवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. सोशल मीडियावर सध्या आधुनिक युगातल्या शंकर देवाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील अचंबित व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमच्या रोजच्या गजबजणाऱ्या रस्त्यावर, ट्रॅफिकमधून फिरताना आणि तुमच्या दारातून जाताना तुम्हाला प्रत्यक्ष शंकर देवाचं दर्शन मिळणं किंवा त्यांना प्रत्यक्ष पाहणं हे तुमच्यासाठी नक्कीच रोमांचकारक असेल. हाच अनुभव सध्या नेटकऱ्यांना अनुभवयाला मिळतोय. आतापर्यंत तुम्ही शंकराची अनेक रूपं ऐकले असतील. पण भगवान शंकराच्या आधुनिक अवताराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये भगवान शंकर चक्क नंदी बनवलेल्या बाईकवर फिरताना आणि भाविकांसोबत सेल्फी घेताना पाहून सारेच जण आश्चर्य होऊ लागले आहेत.

आणखी वाचा : जीवाची पर्वा न करता दलदलीत उतरून काळवीटाच्या पिल्लाचा जीव वाचवला! पाहा VIRAL VIDEO

शंकराच्या रौद्ररुपाला शांत होण्याचे साकडे घालण्यासाठी श्रावणात शंकराच्या मंदिरात जाऊन शिवपूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. अनेक शिवभक्त श्रावणात शंकराच्या मंदिरात दर्शन घेऊन मनोभावे पूजा करतात. पण या व्हायरल व्हिडीओमधल्या अनोख्या शिवभक्ताचा स्वॅग काही निराळाच आहे. या शिवभक्तानं चक्क भगवान शंकराचं रूप साकारून शंकराच्या मंदिराला भेट दिली आहे. शंकर महादेवाच्या या अनोख्या भक्ताने श्रावणात अनोखं रूप साकारण्यासाठी हजारो रुपयांची उधळणही केली आहे. इतकंच काय तर त्याने आपल्या बाईकला नंदीचं रूप देऊन त्यावर स्वार होऊन तो शंकराच्या मंदिरात दर्शन घेत आहे. नंदी बनवलेल्या बाईकवरून स्वार झालेल्या आधुनिक शंकराचा हा व्हिडीओ पाहून जणू काही साक्षात शंकर देवंच प्रकटल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडीओ एकदा पाहिला की तो वारंवार पाहण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही.

आणखी वाचा : “आयुष्य सोपं नाही…!”, ट्रॅफिकमध्ये भर पावसात भिजत होता स्विगी डिलिव्हरी बॉय, पाहा VIRAL VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ वाराणसीमधला असल्याचं सांगण्यात येत आहे. दिनेश कुमार गुप्ता असं या अनोख्या शिवभक्ताचं नाव असून तो इथल्या पिंद्रामधला रहिवासी आहे. तो स्वतःची एक पान टपरी चालवतो. तो भगवान शंकराचा भक्त आहे. त्याची ही अनोखी भक्ती दाखवत आपल्या बाईकलाच नंदी बैलाचे रूप दिलं आणि स्वतः भगवान शंकराचा असा मुखवटा धारण करून शंकराच्या पूजेसाठी शिवमंदिरात पोहोचला. भगवान शंकराला नंदी बाईकवर असं स्वार होऊन ज्यांनी ज्यांनी पाहिलं, ते सर्व जण ‘हर हर महादेव’च्या घोषणा देत होते. तसंच त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची विनंती करताना दिसून येत होते. शंकर देवाच्या रूपात असलेला दिनेश सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आलाय. त्याच्या बाईकवर मागे फडकणारा तिरंगाही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

आणखी वाचा : काही वर्षांतच पाहा कसा-कसा बदलत गेला मायकल जॅक्सनचा चेहरा? VIRAL VIDEO पाहिल्यानंतर नेटकरी झाले भावूक

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सरकारी शाळेतल्या ‘मॅडम’चा राजेशाही थाट! शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांकडूनच करून घेतला मसाज

दिनेशच्या म्हणण्यानुसार, आपल्या बाईकला नंदीचे रूप देऊन आणि स्वतः शंकराचं रूप घेऊन तो श्री काशी विश्वनाथ मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी आला होता. गेल्या काही वर्षांपासून तो या रूपात शंकराच्या दर्शनासाठी येत आहे. त्याच्या बाईकला शिव वाहन नंदी बनवण्यासाठी आणि त्याच्या मेकअपसाठी एकूण १५ हजार रुपये खर्च आला आहे. ही भक्ती पाहून लोक हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे त्याचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shravan 2022 viral video varanasi city bike was given the form of nandi and bhole shankar scooty wale mhadev riding on it was seen scurrying pictures shocked prp
First published on: 29-07-2022 at 13:45 IST