घरात वडील एकटेच कमावणारे. केशकर्तनालयाचा व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. पण अचानक वडिलांना आजाराने घेरले आणि कुटुंबाच्या उत्पन्नाचा स्त्रोत आटला. पुढे काय? असा प्रश्न असताना दोन्ही मुलींनी वडिलांचा केशकर्तनालयाचा व्यवसायात उतरण्याचे ठरविले. त्यांनी ते सिद्धही केले, पण मुलाची वेशभुषा करून. त्या दोन्ही बहिणींच्या कर्तबगाराची दखल उत्तर प्रदेश सरकारने घेतली असून, त्यांचा गौरव केला जाणार आहे. ज्योती कुमारी (वय १८) आणि नेहा (वय १६) अशी त्या दोन्ही बहिणींची नावे आहेत.

उत्तर प्रदेशमधील बनवारी टोला गावामधील ज्योती आणि नेहा या तरूणी आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवत आहेत. दोघींचे वडिल ध्रुव नारायण यांनी केशकर्तनालयाच्या व्यवसायावर चार मुलींची लग्न केली. मात्र आणखी दोन मुलीच्या लग्नाची जबाबारी बाकी होती. वृद्धपकाळाकडे झुकत असलेल्या ध्रुव नारायण यांना एक दिवस अचानक अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुले त्यांचे शरिर अर्धे शरीर निकामी झाले. घरातील कर्ता पुरुष अंथरुणाला खिळून राहिल्यामुळे कुटुंबावर संकटाचा डोंगर उभा राहिला.

ज्योती आणि नेहा या दोन्ही बहिणीने ही जबाबदारी घेतली. लोक काय म्हणतील याचा विचर न करता वडिलांचा पारंपारिक व्यवसाय पुढे चालवायचा त्यांना विडा उचलला. दोघी बहिणींनी वडिलांचे केशकर्तनालयाचे दुकान सुरू केले. दोघी बहिणींने या निर्णयामुळे वडिलांचा रूग्णालयातील खर्च सुरूळतील सुरू झाला. शिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित होऊ लागला आहे. या दोघी बहिणींची चर्चा सध्या स्थानिक भागात होत आहे. दोघींच्या जिद्दीचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. याची दखल उत्तरप्रदेश सरकारने घेतली आहे. उत्तरप्रदेश सरकारकडून त्यांचा सन्मान केला जाणार आहे.