स्वयंपाक बनवणे ही एक कला आहे. त्यामुळे ती आपल्या हातात मुळातच असली पाहिजे. तुम्हालाही वाटत असेल की, ऑनलाइन व्हिडीओ बघून किंवा पुस्तकांच्या मदतीने तुम्ही चांगला स्वयंपाक बनवू शकता; मग तुम्ही चुकीचे आहात. कारण- स्वयंपाक बनवण्यासाठी त्याचा योग्य सराव आणि त्यातील नवीन ट्रिक्स शिकणे आवश्यक आहे; अन्यथा तुम्ही वर्षानुवर्षे चालत आलेल्या त्याच त्याच पद्धती वापरत स्वयंपाक करीत राहता. मग त्यामुळे स्वयंपाकासाठी तुमचा खूप वेळ जातो. त्यामुळे जर तुम्हाला कमी वेळात जर किचन मास्टर बनायचे असेल, तर तुम्ही खालील कुकिंग हॅक्स नक्की फॉलो करा.

भात चिकट होऊ नये यासाठी ट्रिक

जर तुमचा भात रोज चिकट होत असेल, तर पुढच्या वेळी तो बनवताना त्यात थोडे तेल घाला, तसेच त्यातील पाण्याचे प्रमाण मोजा. तांदूळ शिजवताना त्यात हाताच्या दोन मोठ्या बोटांच्या दुसऱ्या रेषेपर्यंत पाणी ठेवा.

diy summer skin care never apply these 4 kitchen ingredients on face can harm your skin
Skin Care : स्वयंपाकघरातील ‘हे’ ४ पदार्थ चुकूनही चेहऱ्यावर लावू नका; अन्यथा…
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

मसाले दीर्घकाळ टिकण्यासाठी उपाय

सर्व मसाले टाकूनही जर भाजी चवदार होत नसेल, तर तसे मसाले खराब झाल्यामुळे होऊ शकते. अशा परिस्थितीत मसाले दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी ते हवाबंद डब्यात आणि थेट प्रकाशापासून दूर ठेवा.

चपाती मऊ बनवण्याची पद्धत

जर चपाती मऊ होत नसेल, तर पीठ कोमट पाणी घालून मळून घ्या. तुम्ही दुधाचा वापर करूनही पीठ मळू शकता. तसेच पीठ मळल्यानंतर ते तूप किंवा तेल लावून काही वेळ झाकून ठेवा आणि त्यानंतर चपात्या बनवायला घ्या.

ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी ट्रिक

भाजीत जास्त पाणी झाल्यास ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी तुम्ही खसखस तळून, त्याची पेस्ट करा. मग ती पेस्ट ग्रेव्हीमध्ये घालून भाजी मध्यम आचेवर शिजवा.

कांदा कापल्यानंतर डोळ्यांतून पाणी न येण्यासाठी ट्रिक्स

कांदे कापताना त्यातील एन्झाइम या घटकामुळे आपल्या डोळ्यातून पाणी येते, तुम्हाला हा त्रास जास्त प्रमाणात होत असेल, तर तुम्ही वापरावयाचे कांदे फ्रिजमध्ये ठेवा. कारण त्यामुळे तुम्हाला रडवणारा कांद्यातील एन्झाइम हा घटक कमी होतो. मग साहजिकपणे तुम्ही न रडता कांदे पटकन कापू शकता. त्याशिवाय कांदे कापताना च्युइंग गम खाणे हा देखील चांगला पर्याय मानला जातो.