सापाचे नाव ऐकताच लोकांची अवस्था बिकट होते. कधी कधी त्याला पाहून लोक पळून जातात. मग जर कोब्रा तुमच्यासमोर आला तर तेव्हा काय अवस्था होईल, याची कल्पना देखील करवत नाही. स्वप्नातही लोक कोब्राबद्दल विचार करत नाहीत. कारण, काही सेकंदातच तो माणसाला आपला बळी बनवतो. जगातील सर्वात विषारी सापांमध्ये याची गणना केली जाते. असं असूनही काही लोक असेही आहेत जे कोब्राला घाबरत नाहीत. इतकंच नाही तर काही लोक मोठ्या उत्कटतेने कोब्राचे प्राण वाचवतात आणि अशा वेळी ते घाबरत सुद्धा नाहीत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती कोब्राला वाचवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारले.

कोब्रा पाहून लोक पळून जातात. एक व्यक्ती त्याच कोब्राला मोठ्या आनंदाने वाचवत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये कोब्रा विहिरीत पडल्याचं दिसून येतंय. शकता. एक व्यक्ती त्या कोब्राला विहिरीतून बाहेर काढताना दिसतोय. तेही जीवाची पर्वा न करता. हा धक्कादायक व्हिडीओ महाराष्ट्रातल्या नाशिकमधला असल्याचे सांगण्यात येत आहे. काही लोकांनी माणुसकी दाखवत या नागाला विहिरीतून बाहेर काढले.

Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
man opts for papaya over cake on birthday
व्यक्तीने वाढदिवशी केकऐवजी कापली पपई, पण का? नेटकऱ्यांना पडला प्रश्न, व्हिडीओ तुफान व्हायरल
terrifying moment man fall off swing
मित्राला झोका देता देता घसरून पडला व्यक्ती, थेट दरीत…. थरारक घटनेचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

आणखी वाचा : हा तर चमत्कारच! पायऱ्यांखाली चक्क उलटी लटकली मांजर, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : वादळ आलं अन्… ट्रक अगदी कागदासारखा उडाला…Viral Video नंतर मिळाली ३५ लाखाची गाडी

अहवालानुसार, एका वन्यजीव संशोधन संस्थेच्या स्वयंसेवकांनी या कोब्राची सुटका केली. त्याला लोखंडी हत्याराने बाहेर काढण्यात आले. त्यात कोब्राही अगदी आरामात गुंडाळला जातो. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या व्यक्तीने कोब्राचा बचाव करताना कोणत्याही प्रकारचे प्रोटेक्शन गियर घातलेले नाही. काही म्हणतात की ते धोकादायक असू शकते. कारण, अनेकवेळा अशा परिस्थितीत कोब्राने लोकांवर हल्लेही केले आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.