Big King Cobra Resuce Shocking Video : कल्पना करा, घरात सर्व जण गाढ झोपेत आहेत आणि अचानक कसला तरी आवाज आला म्हणून तुम्ही ताडकन उठलात. त्यानंतर डोळे उघडताच समोर एक भयानक दृश्य दिसले की, एक महाकाय किंग कोब्रा साप हळूहळू तुमच्या अंथरुणाजवळ येतोय, तर… साहजिकच आहे कोणाबरोबरही असे घडले तरी त्याची पहिल्यांदा सापाला पाहून झोप उडेल आणि नंतर तो घाबरून किंचाळत दूर पळेल. दरम्यान, एका कुटुंबाबरोबर अशीच एक काळजात धडकी भरवणारी घटना घडली. त्या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील छपरौली शहरात ही घटना घडली आहे. त्यात एक कुटुंब बेडरूममध्ये रात्रीच्या वेळी गाढ झोपले होते. यावेळी कुटुंबातील काही व्यक्तींना अचानक कसला तरी मोठमोठ्याने आवाज येऊ लागला. त्यामुळे काहींना जाग आली, जेव्हा कुटुंबातील एका सदस्याने डोळे उघडून बेडरूमचा दरवाजा उघडला तेव्हा समोरच एक भलामोठा किंग कोब्रा फणा पसरवून बसला होता. हे दृश्य पाहून कुटुंबातील सदस्य खूप घाबरले. कारण- हा भलामोठा किंग कोब्रा फणा पसरवून रागात मोठमोठ्याने आवाज करत होता. तो हल्ल्याच्या तयारीत होता; पण वेळीच एकाला जाग आल्याने कुटुंबातील सदस्य वाचले.

यावेळी कुटुंबाप्रमुखाने हळूहळू संपूर्ण कुटुंबाला सुरक्षितपणे खोलीतून बाहेर काढले. त्यानंतर बचाव पथकाला बोलावण्यात आले आणि किंग कोब्राला ताब्यात घेण्यात आले, जेव्हा लोकांनी हा व्हिडीओ पाहिला तेव्हा त्यांनाही धक्का बसला.

कारण- जर या कोब्राने एखाद्याला दंश केला असता, तर त्याचा मृत्यू निश्चित होता. त्याशिवाय असे बरेच लोक होते जे यावर प्रतिक्रिया देत म्हणतायत की, पावसाळ्यात साप कोरड्या जागेच्या शोधत असतात. म्हणून सावधगिरी बाळगा आणि सतर्क राहा.

किंग कोब्राचा हा धडकी भरवणारा व्हिडीओ @hindipatrakar नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, काल रात्री बागपतमधील एका घरात एक कोब्रा साप शिरला. त्याच्या फुसफुसण्याचा आवाज इतका मोठा होता की, आत झोपलेल्या लोकांना लगेच जाग आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर लोक आता वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, भाईसाहेब! हा कोब्रा खूप धोकादायक दिसतोय. दुसऱ्याने लिहिलेय की, पावसाळ्यात गावात या गोष्टी अगदी सामान्य आहेत. तिसऱ्याने लिहिले की भाई, या सापाचे हावभाव पाहून, असे वाटतेयकी तो रागावला आहे आणि आता कोणालाही दंश करू शकतो.