पैशाने तुम्ही गाडी, बंगला विकत घेऊ शकता, जगाच्या पाठीवर कुठेही फिरू शकता पण पैशाने तुम्ही आनंद नक्कीच विकत घेऊ शकत नाही. बंगळुरूमध्ये राहणा-या राजीव शुक्ला यांनाही हेच वाटते. म्हणूनच त्यांनी ७०० हून अधिक भटक्या कुत्र्यांना दत्तक घेतले आहे. राजीव यांनी या भटक्या कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी एक मोठी जागाही विकत घेतली आहे. येथे सा-या कुत्र्यांची काळजी घेतली जाते. त्यामुळे जेव्हा कधी राजीव या जागी येतात तेव्हा आपल्या मालकांचे स्वागत करण्यासाठी ही सारी कुत्री त्यांच्याभोवती जमा होतात.
VIRAL VIDEO : अशी झाली चोराची फजिती
राजीव शुक्ला यांची बंगळुरुमध्ये कंपनी आहे. याआधी ते अमेरिकेत होते. बीबीसीने त्यांची श्वानप्रेमाची गोष्ट सा-या जगासमोर आणली. राजीव शुक्ला नक्कीच श्रीमंत आहेत, कोणतीही वस्तू ते अगदी सहज खरेदी करू शकतात पण पैशाच्या श्रीमंतीपेक्षा त्यांच्या मनाची श्रीमंती अधिक आहे. त्यांने धोडबल्लापुर येथे एक जागा घेतली आहे. जिथे आतापर्यंत त्यांनी पाळलेली ७३५ कुत्री ठेवण्यात आली आहे. हे सारे भटके कुत्रे आहेत. यात कोणी जखमी आहे तर कोणाला त्यांच्या मालकांनी वा-यावर सोडले आहे. या सा-या कुत्र्यांची काळजी राजीव घेतात. या सगळ्या कुत्र्यांना सांभाळण्याचा दिवसाचा खर्च ४५ ते ५० हजार रुपये असल्याचे शुक्ला यांनी बीबीसीला सांगितले. या सर्व कुत्र्यांची देखभाल करण्यासाठी १० कर्मचारी ठेवण्यात आले आहे. यात काही पशूवैद्य देखील आहेत.
वाचा : मुलगा गुगलमध्ये इंजिनिअर, तर वडील गावात करतात मोलमजुरी