scorecardresearch

‘अखियां मिलों कभी…’ एअर होस्टेसचा जबरदस्त डान्स, VIRAL VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ

मागील काही दिवसांपासून विमानातील एअर होस्टेसनी त्यांच्या डान्सच्या व्हिडीओंनी सगळ्यांना वेड लावलंय. आता एका नव्या एअर होस्टेसचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागलाय. या एअर होस्टेसने चक्क बोर्डिंग ब्रीजवर जबरदस्त डान्स केलाय.

spicejet-air-hostesse-dance-video-viral
(Photo: Instagram/ yamtha.uma)

सोशल मीडियावर दररोज अनेक भावनिक, मजेशीर किंवा चीड आणणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओ अवघड किंवा तणावाच्या परिस्थितीमध्येही लोकांमध्ये जगण्याची किती उर्मी आणि उत्साह आहे, याचा प्रत्यय आणून देणारे असतात. त्यातल्या त्यात मागील काही दिवसांपासून विमानातील एअर होस्टेसनी त्यांच्या डान्सच्या व्हिडीओंनी सगळ्यांना वेड लावलंय. जवळजवळ सोशल मीडिया विमानातील एअर होस्टेसच्या डान्स व्हिडीओंनी पूर्ण भरलाय. आता एका नव्या एअर होस्टेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या एअर होस्टेसने चक्क बोर्डिंग ब्रीजवर जबरदस्त डान्स केलाय.

आतापर्यंत तुम्ही विमानात सेवा देणाऱ्या एअर होस्टेसच्या डान्सचे व्हिडीओ पाहिले असतील. आता नव्या एअर होस्टेसच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या एअर होस्टेसचं नाव उमा मीनाक्षी असं असून ती स्पाइसजेटची एअर हॉस्टेस आहे. यापूर्वी सुद्धा तिचे अनेक व्हिडीओ चर्चेत आले होते. आता तिने नवा व्हिडीओ शेअर केला असून यात तिने ‘अखियां मिलों कभी…’ या बॉलिवूड गाण्यावर ठुमके लावले आहेत. तिने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. तिच्या अफलातून डान्स मुव्ह्स पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत. तिचे हावभाव पाहून सुद्धा नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच हा व्हिडीओ प्रत्यक्ष पाहा.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : प्री-वेडिंग फोटोशूटच्या नादात नवरा नवरी थेट पाण्यात; फोटोग्राफरचा कॅमेरा सुद्धा वाहून गेला

इथे पाहा व्हिडीओ :

आणखी वाचा : PHOTOS : सर्वात मोठी मिशीवाला कोण आहे? दाढी-मिशीच्या या अनोख्या स्पर्धेचे PHOTO VIRAL

उमा मीनाक्षी ही एअर होस्टेस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर भरपूर सक्रीय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. या माध्यमातून ती सतत आपल्या फॉलोअर्सच्या संपर्कात राहते. तिच्या इन्स्टाग्रामवर जवळपास ७८ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

तिचा हा नवा व्हिडीओ अगदी वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो नेटकऱ्यांनी तिच्या या अफलातून डान्सला लाईक करत कमेंट्सचा वर्षाव सुरू केलाय. काही युजर्सनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलंय तर काही युजर्सनी तर तिच्या डान्स परफॉर्मन्सचं कौतुक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-11-2021 at 17:28 IST

संबंधित बातम्या