कोडं सोडवणं हे आता काहीसं मागेच पडलंय. एखाद्याला विचार करायला लावण्याचं हे उत्तम साधन आहे. दैनंदिन कामात व्यग्र असतानाच अचानक एखादं कोडं आपल्यासमोर आलं तर आपण त्यावर विचार करतो आणि ते सोडवल्यानंतर नक्कीच फ्रेश होतो. त्यानंतर नव्या दमानं पुन्हा कामला सुरुवात करतो. सध्या सोशल मीडियाने आयुष्याचा बराचसा भाग व्यापला आहे. दिवसातला बराचसा वेळ आपण ऑनलाईन असतो. व्हॉट्सअॅपवर आलेले बिनकामाचे अनेक मेसेज वाचण्यात वेळ घालवतो. त्यापेक्षा विचार करायला लावणारी कोडी सोडवली तर त्याचा नक्कीच फायदा होतो. एकाग्रतेसाठी अशाप्रकारचे प्रयोग लाभदायक ठरतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असंच एक कोडं सध्या फेसबुकवर व्हायरल झालं आहे. ‘सनशाईन कोस्ट स्नेक कॅचर्स’ संस्थेने आपल्या फॉलोअर्सना एका घरासमोरच्या बगिचातील साप शोधण्याचे आव्हान दिले आहे. संस्थेतर्फे आपल्या फेसबुक वॉलवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. तुम्हाला वाटलं असेल इतकं काय त्यात! साप तर शोधायचा आहे ना. पण तसे नसून या बगिचात गवताचं रान माजलंय, विटा रचून ठेवल्या आहेत आणि कुंपणाच्या आजूबाजूला झाडेही आहेत. इतकेच नाही तर पाईपही पडलेले असल्याने त्यातून या सापाला शोधणं एकप्रकारचं आव्हानच आहे.

काय मग उत्तर नाही ना सापडलं? फार टेन्शन घेऊ नका, त्याचं उत्तर आम्ही सांगतो. तर हा साप दडलाय एका झाडावर. बगिचाचे कुंपण आणि या सापाचा रंग सारखाच आहे. त्यामुळे तो सहज दिसत नाही. या फेसबुक पोस्टवर अनेकांनी उत्तरं द्यायचा प्रयत्न केला आहे. अगदी कमी जणांना त्याचे उत्तर देणे जमले आहे. बाकीच्यांनी मात्र साप कुठे आहे असाच प्रश्न विचारला आहे. पाहा तुम्हाला सापडतो का ते?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spot the snake in photo challenge for all most people cant
First published on: 24-08-2017 at 16:30 IST