गुगलने आज सोमवारी प्रसिद्ध कविता झांसी की रानी लिहिणाऱ्या भारतीय कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांना त्यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त डूडलद्वारे सन्मानित केले आहे. डूडलमध्ये कुमारीजी पेन आणि कागद घेऊन साडीमध्ये बसलेल्या दिसतात. तर राणी लक्ष्मीबाई मागच्या घोड्यावर दिसून येतात आणि काही काहीजण देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात कूच करताना दिसून येत आहे. सुभद्रा कुमारी यांनी हिंदी कवितेत अनेक कलाकृती लिहिल्या असून, झाशी की रानी ही त्यांची सर्वात प्रसिद्ध रचना आहे. राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनाचे वर्णन करणारी ही कविता हिंदी साहित्यातील सर्वात जास्त पठित आणि गायलेल्या कवितांपैकी एक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुभद्रा कुमारी चौहान यांचा प्रवास

चौहान यांच्या कविता आणि गद्य प्रामुख्याने भारतीय स्त्रियांनी लिंगभेद आणि जातिभेद यासारख्या अडचणींवर मात करण्यावर लक्ष केंद्रित करतात. त्यांच्या कवितेतून दृढ राष्ट्रवाद अधोरेखित होतो आणि हेच त्यांच्या कवितेचं अनोखेपण आहे. सुभद्रा कुमारी यांचा जन्म १६ ऑगस्ट १९०४ रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील निहालपूर गावातील एका राजपूत कुटुंबात झाला. त्यांनी प्रयागराजच्या क्रॉस्टवेट गर्ल्स स्कूलमध्ये सुरुवातीला शिक्षण घेतले आणि १९१९ मध्ये मिडल स्कूलची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी १९१९ मध्ये खंडवाच्या ठाकूर लक्ष्मण सिंग चौहान यांच्याशी वयाच्या १६ व्या  वर्षी लग्न केले आणि त्यांना ५ मुले होती. नंतर त्या जबलपूरला गेल्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhadra kumari chauhan google doodle first woman satyagrahi subhadra kumari chauhan biography quotes inventions ttg
First published on: 16-08-2021 at 10:46 IST