Google CEO : ‘गूगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकताच एक ब्लॉग लिहिला आहे; ज्यामध्ये त्यांनी त्यांचा २५ वर्षांपूर्वीचा जुना किस्सा सांगितला आहे. हा किस्सा इतका भावनिक आहे की, तो ऐकून तुम्हीही भावूक व्हाल. खरे तर, ४ सप्टेंबर २०२३ रोजी ‘गूगल’ने २५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने ‘गूगल’ची मूळ कंपनी ‘अल्फाबेट’चे सीईओ सुंदर पिचाई यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देणारा ब्लॉग लिहिला आहे; ज्यामध्ये पिचाई यांनी त्यांच्या वडिलांसोबत साधलेल्या संवादाबाबतचा उल्लेख आहे. चला तर मग आपण जाणून घेऊ काय आहे हा किस्सा?

वडिलांना २५ वर्षापूर्वी केला होता पहिला ईमेल

‘अल्फाबेट’चे सीईओ सुंदर पिचाई यांनी तंत्रज्ञानाने गेल्या २५ वर्षांत आमची संवाद साधण्याची पद्धत कशी बदलली आहे हे सांगितले. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा ते अमेरिकेत शिकत होते, तेव्हा त्यांचे वडील भारतात राहत होते. त्या काळात एकमेकांशी संवाद साधण्याचा सर्वांत स्वस्त मार्ग म्हणजे ईमेल होता. पिचाई यांनी आपल्या वडिलांना पहिल्यांदाच एक ईमेल पाठवला आणि त्याचं उत्तर त्यांना त्यावेळी दोन दिवसांनी मिळाले. त्यामध्ये त्याच्या वडिलांनी लिहिले होते, ”प्रिय पिचाई, ईमेल मिळाला. सर्व काही ठीक आहे.”

delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

हेही वाचा – नवऱ्याला नीट भाजी आणता येईना, वैतागलेल्या पत्नीने दिली हटके यादी, व्हायरल फोटो पाहून तुम्हालाही येईल हसू

ईमेलला उत्तर मिळाले नाही म्हणून पिचाई यांनी वडिलांना केला फोन

ईमेलला उत्तर मिळण्यास उशीर झाल्यामुळे वडिलांना फोन केला होता. तेव्हा वडिलांनी सांगितले, “त्यांच्या ऑफिसमध्ये कोणाला तरी त्यांच्या कॉम्प्युटरवर
ईमेल पाहावा लागेल. मग त्याची प्रिंटआउट घ्यावी लागेल आणि मग ती प्रिंटआउट त्यांच्यापर्यंत पोहोचते.’ पिचाई यांनी सांगितले, ”त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी एक संदेश लिहिला आणि मग तो पाठवण्यासाठी कोणाकडून तरी तो टाईप करून घेतला.

हेही वाचा – तरुणाला करायचे होते मनाप्रमाणे लग्न, महादेवाची केली पूजा, इच्छा पूर्ण झाली म्हणून मंदिरातून चोरले शिवलिंग

पिचाई यांनी त्यांच्या मुलाचा देखील सांगितला किस्सा

पिचाई यांनी सांगितले की, आजच्या काळात टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. त्यांनी सांगितले, ”एकदा ते त्यांच्या मुलाबरोबर होते. त्यांनी काहीतरी पाहिले आणि संबंधित बाबीचा फोटो मोबाईलमध्ये काढला आणि आपल्या मित्रांबरोबर तो शेअर केला. मग त्यांनी एकमेकांना मेसेज पाठवला. मला हे सर्व खिशातून फोन काढण्यापेक्षा जास्त गतीने घडत असल्यासारखे वाटले. इतक्या वर्षांपूर्वी मी माझ्या वडिलांबरोबर संवाद साधला होता. त्या तुलनेने आज माझा मुलगा ज्या प्रकारे संवाद साधतो, त्यातील फरक पाहून लक्षात येते की, दोन पिढ्यांमध्ये किती बदल होऊ शकतो.”

Google ची स्थापना ४ सप्टेंबर १९९८ रोजी लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन( Larry Page and Sergey Brin) यांनी केली होती. वर्षानुवर्षे, कंपनीने जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन बनण्यासाठी विविध बदल केले. २००४ मध्ये कंपनीत रुजू झालेल्या सुंदर पिचाई यांनी २०१५ मध्ये लॅरी पेजच्या जागी सीईओची जबाबदारी स्वीकारली.

कंपनीच्या आगामी वाढदिवसाविषयी (पूर्वीचे ट्विटर) X वर पिचाई यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. “वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या मित्रा,” असे एकाने पोस्ट केले. . “वाढदिवसाच्या शुभेच्छा गुगल. हा शब्द आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे,” आणखी एकाने कमेंट केली.

“२५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Google! तुमचा प्रवास जगभरातील लाखो लोकांसाठी परिवर्तनकारी आहे. तुम्ही अगणित प्रश्नांसाठी उत्तरे दिल्याबद्दल आणि अनेक वर्षांच्या नावीन्यपूर्ण आणि शोधांसाठी शुभेच्छा!”आणखी एकाने लिहिले. “गुगल ही फक्त२५ वर्षांची तरुण कंपनी आहे यावर विश्वास बसत नाही. असे दिसते की ते आमच्या आयुष्यात कायमचे आहे! ” चौथ्याने लिहिले.