इमारतीच्या कार्यालयाला जबरदरस्त धडक दिलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या फोटोमागे दडलाय तसा गंमतीशीर किस्सा. संबधित चालक आपली ड्रायव्हिंग टेस्ट देत होती. पण, पहिल्याच प्रयत्नात ती अपयशी झाली, कारण टेस्ट देत असताना गाडी रिव्हर्स घेण्याऐवजी तिनं ती पुढे घेतली आणि गाडीची जबरदस्त धडक एका इमारतीला बसली. यात गाडीसह इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बफेलो पोलीस विभागानं आपल्या फेसबुक पेजवर ही पोस्ट शेअर केली. १७ वर्षीय मिनेसोटा येथे राहणारी ही मुलगी वाहन चालक परवान्यासाठी आली होती. रितसर परीक्षाही देत होती. पण ड्रायव्हिंग टेस्ट देताना तिचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडीची धडक इमारतीला बसली. यात  तिच्यासोबत असणारे ६० वर्षांचे प्रशिक्षकही जखमी झाले आहेत. मुलगी परीक्षा पास झालीच नाही पण तिचं हसं मात्र झालं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teen crashes car into exam centre wall during driving test
First published on: 26-03-2018 at 17:31 IST