Sports bike riding accident video: नवीन वर्षात चांगले संकप्ल करून अनेकांचा प्रवासाला सुरुवात झाली असेल, पण एका तरुणीचा प्रवास मात्र धोकादायक ठरला आहे. कारण भरधाव वेगानं स्पोर्ट्स बाईक चालवणाऱ्या एका तरुणीने हायवेवर उभ्या असलेल्या एका तरुणाला जोरदार धडक दिली. तरुणाच्या पायावर धडक दिल्याने तो रस्त्यावर खाली पडला. या अपघाताचा संपूर्ण थरारा कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दोन मुलं त्यांची स्पोर्ट्स बाईक रस्त्याच्या बाजूला उभी करुन एकमेकांशी गप्पा मारत असतात. त्याचदरम्यान हायवेवरून एक तरुणी स्पोर्ट्स बाईक सुसाट चालवत असते. स्पोर्ट्स बाईकच्या वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने तरुणीने त्या तरुणाला धडक दिली असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे.

….अन् तरुणीने तरुणाच्या पायाला दिली जोरदार धडक

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर स्पोर्टस बाईकचा अपघात झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक तरुणी बाईक रायडिंग करताना दिसत आहे. पण हायवेवर बाईक चालवताना तिला वेगावर नियंत्रण ठेवता आलं नाही. परिणामी, समोर असलेल्या तरुणाला तिने जोरदार धडक दिली. बाईकची टक्कर लागताच तो तरुण रस्त्यावर पडला. बाईक रायडिंगचा हा संपूर्ण थरार कॅमेराबद्ध झाला. हा अपघात इतका गंभीर नव्हता. पण सर्वांना किरकोळ दुखापत झाली. व्हिडीओ पाहून असं वाटतंय की, हा संपूर्ण ग्रुप बायकर्सचा आहे. या व्हिडीओत अनेकांनी हेल्मेट घातल्याचं दिसत आहे. पण बाईक चालवणाऱ्या तरुणीने मात्र हल्मेट घातलं नाहीय.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
salman khan steps out of bandra home a day after gunfire incident
Video : घरावर झालेल्या गोळीबारानंतर पहिल्यांदाच बाहेर पडला सलमान खान, गॅलेक्सी अपार्टमेंटजवळचा व्हिडीओ व्हायरल
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब

नक्की वाचा – Video: तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात टाकून विशाल अजगराला वाचवलं, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक व्हिडीओ Viral

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ danik_rajput नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे सहा दिवसांपूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत २० लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर तब्बल ५ कोटींहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. हा थक्क करणारा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. स्पोर्ट्स बाईकवर स्टंटबाजी करून रील किंवा व्हिडीओ बनवण्याचं फॅड तरुण मुलांमध्ये वाढताना दिसत आहे. कारण दिवसेंदिवस बाईकवर धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन काही तरुणांनी अपघाताला आमंत्रण दिलं असल्याच्या घटनाही इंटरनेटच्या माध्यमातून समोर आल्या आहेत.