कुत्र्यासोबत फोटोशूट करणं १७ वर्षीय तरुणीला चांगलंच महागात पडलं. मित्राच्या कुत्र्यासोबत फोटोशूट करत असताना लारा सॅन्सन नावाच्या तरुणीवर कुत्र्याने हल्ला चढवला. कुत्र्याने तरुणीच्या चेहऱ्यावरच जोरदार हल्ला चढवला आणि या हल्ल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर तब्बल ४० टाके पडले. जर्मन शेफर्ड जातीचा हा कुत्रा होता. कॅमेरासमोरच ही घटना घडल्याने याचे बरेच फोटो कॅमेऱ्यात कैद झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घटनेनंतर दिलेल्या एका मुलाखतीत लारा म्हणाली, “मला वाटत की मी त्या कुत्र्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मी त्याच्या गळ्यात हात घालून फोटो काढण्यासाठी पोझ दिली आणि तो संतापला. जेव्हा त्याने चावा घेतला तेव्हा मला फार त्रास झाला नाही, वेदना जाणवल्या नाहीत. पण नंतर त्याची जाणीव झाली.” कुत्र्याने लाराच्या चेहऱ्याचा चावा घेतल्याने तिचा चेहरा विद्रूप झाला आहे. जवळपास दोन तास तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. लाराच्या डोळ्याजवळ आणि तोंडाजवळ ४० टाके पडले.

छायाचित्र सौजन्य- ट्विटर/ लारा सॅम्सन

शस्त्रक्रियेनंतरचे काही फोटो लाराने स्वत: तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teenager receives 40 stitches following dog attack during photo shoot ssv
First published on: 17-01-2020 at 19:01 IST