आपल्या देशात मोठमोठ्या नेत्यांचे दौरे असले की त्या मार्गावरील वाहतुकीत ऐनवेळी बदल केला जातो, ज्यामुळे सामान्य नागरिकांना वाहतुक कोंडीचा किती सामना करावा लागतो हे नव्याने सांगण्याची गरज नाही. शिवाय अशा VIP नेत्यांच्या ताफ्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास झाल्याच्या घटनांचे अनेक व्हिडीओ तुम्ही यापूर्वीही सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्हीव्हीआयपी ताफ्यासाठी अचानक वाहतूक बंद करण्यात आली होती. ज्यामुळे दोन रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. शिवाय बराच वेळ रुग्णवाहिकेला रस्ता न मिळाल्यामुळे एक महिला तिथे तैनात असलेल्या पोलिसाला जाब विचारण्यासाठी गेल्याचं पाहायला मिळत आहे.

व्हिडीओतील महिला पोलीस कर्मचाऱ्याला विचारते, “तुम्ही वाहतूक का बंद केली?’ यावर पोलीस, व्हीव्हीआयपी ताफा येत असल्याचं सांगतो. महिला विचारते, “व्हीव्हीआयपी कोण आहेत, ते मुख्यमंत्री आहेत का?” यावर पोलीस सांगतो, ‘तो ताफा राज्यपाल मॅडमचा आहे.’ यावर महिला म्हणते “मग मी, ट्विटरवर पोस्ट करू का? की तुम्ही राज्यपालांसाठी रुग्णवाहिका थांबवत आहात?” यानंतर पोलीस कर्मचारी फोनवर कोणाशी तरी बोलायला सुरुवात करतो.

former director of agricultural produce market committee arrested in toilet scam
कृषी उत्पन्न बाजार समिती : शौचालय घोटाळा, एक माजी संचालक  अटक तर दुसऱ्याची चौकशी, एपीएमसीत खळबळ 
canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
mumbai, J J Hospital, ART Center, HIV AIDS Treatment, Celebrate 20 Years, 43 thousand, Patients Treated,
जे. जे. रुग्णालयात ४३ हजार एचआयव्ही रुग्णांवर उपचार, पहिल्या एआरटी केंद्राला २० वर्षे पूर्ण

हेही पाहा- महिलेच्या निष्काळजीपणामुळे घडला भीषण अपघात, भररस्त्यात कारचा दरवाचा उघडायला गेली अन्…, थरारक VIDEO व्हायरल

महिलेला पुढे जाताना पाहून तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकंही पोलिस कर्मचाऱ्याला रुग्णवाहिका जाऊ द्या, असं सांगतात. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यारी फोनवर बोलतो आणि रुग्णवाहिकेला जाण्याची परवानगी देतो. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तर हा व्हिडीओ लखनऊच्या अमर शहीद पथ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिलं, “व्हीआयपी कल्चर संपवण्याचे मोठंमोठे दावे केले जातात पण परिस्थिती तशीच आहे. राज्यपाल मॅडमच्या व्हीआयपी ताफ्यामुळे दोन रुग्णवाहिका अडकल्या.” तर अनेकांनी व्हिडीओतील महिलेचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी सर्व लोक या महिलेप्रमाणे जागरूक झाले तर संपूर्ण व्यवस्था सुधारु शकते असंही कमेंट बॉक्समध्ये म्हटलं आहे.