Viral Video: समाजमाध्यम वापरकर्त्यांसाठी रस्त्यावर डान्स करणाऱ्यांचे विविध व्हायरल व्हिडीओ पाहणं नवीन गोष्ट नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोतील एका तरुणीचा अश्लील डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यावर युजर्सने प्रचंड संताप व्यक्त केला होता. दरम्यान, दिल्लीनंतर मुंबईमध्येदेखील अशाच एका तरुणीने भररस्त्यात अश्लील डान्स केला आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. त्याच प्रकारे आता रस्त्यावर, ट्रेनमध्ये कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. अनेक जण प्रसिद्ध होण्यासाठी हल्ली कुठेही रिल्स बनवताना दिसतात. रिल्स, डान्स, गाणी या सर्व गोष्टी पाहणं ठीक आहे; पण जेव्हा या गोष्टी अशा प्रकारे अश्लील पद्धतीनं दाखवल्या जातात, तेव्हा त्या गोष्टींना वेळीच आळा घालणं गरजेचं आहे. सध्या व्हायरल होत असेलला हा व्हिडीओ मुंबईच्या मरिन ड्राइव्हवरील असून एक इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर यामध्ये खूप घाणेरड्या पद्धतीने डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता, एक तरुणी मुंबईच्या मरिन ड्राइव्ह येथे डान्स करायला सुरुवात करते. त्यानंतर पुढे ती अश्लील डान्स करताना दिसतेय. यावेळी रस्त्यावरील इतर लोक तिच्याकडे टक लावून पाहतात, तर काही जण तिचा घाणेरडा डान्स पाहून तिच्याकडे दुर्लक्ष करतात. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

हेही वाचा: याला म्हणतात मराठमोळा डान्स! नऊवारी नेसून गुलाबी साडी गाण्यावर महिलांनी धरला ठेका… Viral Video पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @manishadancer01 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत जवळपास ८० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर एक हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवरील कमेंटमध्ये एकाने लिहिलंय की, “लाज सोडली वाटतं हिने”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “आता हे लोक मुंबईलापण खराब करणार”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “हिच्यामुळे शेजारी उभे असलेल्या लहान मुलांवर काय परिणाम होईल.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “अशाप्रकारचा डान्स करून काय मिळतं तुम्हाला?”