अयोध्येत प्रभू रामाच्या बालस्वरूपाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेली मूर्ती मंदिरातल्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन ठेवली जाणार आहे. पण सर्वच मूर्तिकारांना मूर्ती घडवण्याचा हा बहुमान मिळाला नाही. तरीही कलाकार त्यांच्या पातळीवर नवनवीन कलाकृती सादर करत आहे. यामध्ये राजस्थानचे तरुण शिल्पकार नवरत्न प्रजापती यांनी सर्वात छोटी प्रभू रामाच्या मुर्तीची निर्मिती केली आहे. तरुण कलाकाराने चक्क पेन्सिलच्या टोकावर श्री रामाची मुर्ती कोरली आहे. ही मुर्ती अत्यंत छोटी आहे जी पाहिल्यावर तुम्हीही ‘जय श्री राम’ म्हणाल!
आज तकने दिलेल्या माहितीनुसार, जयपूरच्या महेश नगरमध्ये राहणारे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नावावर असलेले शिल्पकार नवरत्न प्रजापती यांनी सांगितले की, “लेखनासाठी वापरल्या जाणार्या पेन्सिलच्या टोकावर रामाची कलाकृती तयार करण्यासाठी त्यांना सुमारे ५ दिवस लागले. त्याची लांबी १.३ सेंटीमीटर आहे. त्याचबरोबर एका हातात धनुष्य आणि दुसऱ्या हातात बाण कोरून रामाची मूर्ती साकारण्यात आली आहे. ही मूर्ती राम संग्रहालयात ठेवण्यासाठी श्रीराम ट्रस्टला भेट दिली जाणार आहे. जेणेकरून प्रभू राम भक्तांना नेहमी त्याचे दर्शन घेता येईल.”
हेही वाचा – मुंबईच्या रस्त्यावरुन धावणारी ‘Batmobile’ पाहिली का? ‘हटके’ कारचा व्हिडीओ होतोय व्हायरल
हेही वाचा – राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी भाविकांच्या प्रसाद बॉक्समध्ये कोणते ७ पदार्थ होते? फोटो आला समोर
याआधी त्यांनी २ मिमीचा लाकडी चमचा बनवला होता आणि पेन्सिलच्या टोकावर गणपती, भगवान महावीर स्वामी, महाराणा प्रताप, वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, डॉ भीमराव आंबेडकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि १०१ कड्यांची साखळी देखील बनवली आहे. आता सारा देश रामोत्सव साजरा करत असताना ते मागे कसे राहणार? आता त्यांनी पेन्सिलच्या टोकावर रामाचे रुप कोरले आहे.