सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे व्हिडीओ असतात तर काही हृदय पिळवटून टाकणारे. सध्या असाच एक कार अघाताचा भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घेतली नाही तर आपणाला कोणत्या संकटाला सामोरं जावं लागतं हे देखील व्हिडीओ पाहून समजणार आहे.

हेही पाहा- ‘तो’ सिंहाच्या तावडीत सापडला आणि लोक Video करत राहिले; संतप्त नेटकरी म्हणाले, ‘माणुसकी…’

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कारचा अपघात झाल्यानंतर कारचालक फुटबॉलप्रमाणे हवेत उडाल्याचं दिसतं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी वाहनचालकाने सीटबेल्ट वापरला नसल्याचं म्हटलं आहे. जर या कारचालकाने सीटबेल्ट लावला असता तर कदाचित तो बचावला असता असं काहींनी म्हटलं आहे.

हेही पाहा- Video: विजेच्या खांबावर चढून प्रेयसीला केला Video Call; मोठ्याने आय लव्ह यू म्हणाला अन्….

व्हायरल होत असलेली ही कार अपघाताची क्लिप केवळ ९ सेकंदांची आहे. यामध्ये एका हायवेवर अनेक कार भरधाव वेगाने धावत असल्याचं दिसतं आहे. या व्हिडीओमध्ये एक वेगाने धावणारी कार विरुद्ध दिशेने येते आणि समोरून येणाऱ्या वाहनांना जोराची टक्कर देते. हा अपघात एवढा भीषण आहे की कारचा चक्काचूर झाल्याचं दिसतं आहे. शिवाय कारमधील व्यक्ती फूटबॉलप्रमाणे हवेत उंचावर फेकल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहे. त्यामुळे वाहन चालवताना योग्य ती काळजी घेतली नाही तर आपणाला कशा संकटांना सामोरं जावं लागतं याचं उदाहरणच या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. शिवाय हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोक सीटबेल्ट वापरायला सुरुवात करतील यात शंका नाही अशा कमेंट युजर्स करत आहेत.

ही व्हिडीओ @ViciousVideos नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत तो ४२ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. दरम्यान हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती समोर आलेली नाही. शिवाय हा व्हिडीओ खोटा असल्याचंही काही नेटकरी म्हणत आहेत. मात्र, हा अपघात खरा असेल तर नागरिकांनी वाहन जपून चालवायला हवीत आणि असे अपघात टाळायला हवेत असंही काही लोक म्हणत आहेत.