scorecardresearch

Video: ढोल-ताशांचा आवाज ऐकून महिलांचा स्वत:वरील ताबा सुटला; चक्क जमिनीवर लोळत केला भन्नाट डान्स

दोन महिला ढोल-ताशांच्या तालावर खूप उत्साहाने नाचत आहेत तर आणखी दोन महिला चक्क जमिनीवर लोळताना दिसत आहेत

women dancing to the tune of dhol nagade
सोशल मीडियावर दररोज नवनवीन आणि आपलं मनोरंजन करणारे हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. (Photo : Instagram)

सोशल मीडियावर दररोज नवनवीन आणि आपलं मनोरंजन करणारे हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सर्वाधिक डान्सच्या व्हिडीओंचा समावेश असतो. मागील काही दिवसांपासून अनेक महिलांचे अनोखे आणि भन्नाट डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच आता आणखी काही महिलांच्या डान्सचा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. शिवाय हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणं कठिण होणार आहे.

या व्हिडीओमध्ये काही महिला नाचत आहेत पण त्या ज्या स्टाईलमध्ये नाचत आहेत ते पाहून त्या नाचतायत की काही व्यायाम करतायत हेच कळायला मार्ग नाही. या महिला इतक्या जोरात डान्स करत आहेत की ते पाहून उपस्थित लोकदेखील थक्क झाल्याचं दिसत आहे. या महिला लग्न समारंभाच्या कार्यक्रमात डान्स करत असल्याचं तेथील वातावरणावरुन वाटत आहे. शिवाय तेथील ढोल-ताशांचा आवाज जसा वाढेल तसं त्या अधिक जोरजोरात नाचायला सुरुवात करतात.

हेही पाहा- ट्रेनमध्ये सिगारेट पिणाऱ्या तरुणांनी प्रवाशांनाच केली शिवीगाळ, Video व्हायरल होताच नागरिकांनी व्यक्त केला संताप

व्हिडीओत दोन महिला ढोल-ताशांच्या तालावर खूप उत्साहाने नाचत आहेत तर आणखी दोन महिला चक्क जमिनीवर लोळताना दिसत आहेत. या महिलांचा डान्स पाहण्यासाठी व्हिडीओमध्ये लोकांनी गर्दी केल्याचंही पाहायला मिळतं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांना या महिलांचा भन्नाट आणि बिनधास्त डान्स आवडला असून त्यांच्यात खूप उर्जा आणि उत्साह असल्याचं म्हटलं आहे.

डान्सचा इंटरनेटवर धुमाकूळ –

हेही पाहा- कार चालवताना सीट बेल्ट न लावणं बेतलं जीवावर, पोलिसांनी शेअर केलेला Video पाहून तुम्हीही व्हाल सतर्क

व्हायरल होत असलेल्या या डान्सचा व्हिडीओ deepaksing1695 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये असा डान्स फक्त मुलंच करु शकतात हा आमचा गैरसमज आज दूर झाल्याचं लिहिलं आहे. ही व्हिडीओ आतापर्यंत ५४ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 16:34 IST
ताज्या बातम्या