scorecardresearch

ट्रेनमध्ये सिगारेट पिणाऱ्या तरुणांनी प्रवाशांनाच केली शिवीगाळ, Video व्हायरल होताच नागरिकांनी व्यक्त केला संताप

ट्विटमध्ये प्रवाशाने लिहिलं आहे की, “सिगारेट ओढणाऱ्या तरुणांना ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसमोर सिगारेट ओढू नका, असं सांगितलं असता त्यांनी शिवीगाळ केली”

men lighting cigarettes in Railway
एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ IRCTC आणि रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत खात्यांना टॅग केला आहे. (Photo : Twiter)

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करु नये, अशा प्रकारचे अनेक फलक आपण दररोज पाहत असतो. पण अनेकजण याच फलकांच्या शेजारी उघड्यावर सिगारेट पिताना दिसतात. त्यामुळे लोक प्रशासनाचे घालून दिलेल्या नियमांचे कसे उल्लंघन करत असतात. मात्र, एसटी, विमान किंवा रेल्वेतून प्रवास करताना अनेक लोक खबरदारी घेतात आणि ते प्रवासादरम्यान धुम्रपान करणं टाळतात. पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन तरुण रेल्वे प्रवासादरम्यान इतर प्रवांशासमोर सिगारेट पिताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढू नका असं सांगणाऱ्या प्रवाशांनाच त्यांनी शिवीगाळ केली आहे.

प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी भारतीय रेल्वेचे ट्विटर हँडल नेहमीच तत्पर असते. अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. यामधील अनेक तक्रारी ट्रेनमधील खाद्यपदार्थ आणि सेवांच्या दर्जाबाबत असतात. शिवाय अशी काही उदाहरणे आपण पाहिली आहे. मात्र, तरीही अनेक लोक रेल्वे प्रवासादरम्यान कायदा मोडतात किंवा बेशिस्त वर्तन करतात. सध्या असाच एक एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोन मुलं धावत्या ट्रेनमध्ये इतर प्रवाशांसमोर सिगारेट पिताना दिसत आहेत.

हेही वाचा- ऐकावं ते नवलच! चोरट्यांनी पळवला २ किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक; फोटो होतोय Viral

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सहप्रवासी मनीष जैन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. शिवाय हा व्हिडीओ शेअर करताना त्याने तो IRCTC आणि रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत खात्यांना टॅग केला आणि त्वरित कारवाईची विनंती केली.ट्विटमध्ये प्रवाशाने लिहिलं आहे की, “सिगारेट ओढणाऱ्या तरुणांना ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसमोर सिगारेट ओढू नका, असं सांगितलं असता त्यांनी शिवीगाळ केली” तक्रारकर्त्याने लिहिले की, “ट्रेन क्रमांक 14322 कोच S-5 सीट क्रमांक 39-40 मधील प्रवाशांनी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसमोर सिगारेट ओढली आणि शिवीगाळ केली. कृपया लवकरात लवकर कारवाई करा.”

व्हिडीओ व्हायरल होताच नागरिकांनी व्यक्त केला संताप-

सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून रेल्वे प्रवाशांसह अनेक नागरिकांनी संताप व्यक्त करत धुम्रपान करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या व्हिडीओची दखल घेत, भारतीय रेल्वेने प्रवाशाच्या ट्विटला रिप्लाई दिला आणि ते सध्या कोणत्या ट्रेनमध्ये आहेत आणि ट्रेन कोणत्या स्टेशनवर थांबणार आहे याची सविस्तर माहिती देण्यास सांगितले.

त्यानंतर तक्रारदाराने संपुर्ण माहिती दिल्यानंतर काही वेळातच रेल्वे स्टेशनवर एका आरपीएफ जवानाने त्या रेल्वेच्या डब्यात जाऊन त्या प्रवाशांना ट्रेनमध्ये धुम्रपान न करण्याचा इशारा दिला. शिवाय रेल्वे प्रशासनाने तत्काळ केलेल्या कारवाईमुळे ट्रेनमधील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आणि रेल्वेवरील विश्वास आणखीनच वाढल्याचं पाहायचा मिळालं. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक नागरिक त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 11:44 IST