सबसे कातील गौतमी पाटील अशी महाराष्ट्रात ज्या नृत्यांगनेची ओळख आहे तिने आता तिच्या कार्यक्रमात जेव्हा गडबड, गोंधळ किंवा तत्सम जे प्रकार घडतात त्यावर भाष्य केलं आहे. गौतमी पाटीलने बारामती या ठिकाणी एक कार्यक्रम केला. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर तिला गडबड आणि गोंधळाविषयी विचारण्यात आलं तेव्हा गौतमी पाटीलने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. बारामती तालुक्यातल्या झारगडवाडी या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे.

काय होता कार्यक्रम?

बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे पार्थ पवार युथ फाउंडेशन दहीहंडी उत्सवाला गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. मेखळी येथील भैरवनाथ दहीहंडी संघाने येथील दहीहंडी फोडली. झारगडवाडी येथील कार्यक्रमात अतिशय शिस्तबद्ध नियोजन असल्याने माझ्या कार्यक्रमात कुठलाही गोंधळ झाला नाही यामुळे आयोजकांचे नियोजन मला आवडले असल्याचे गौतमी पाटील हिने प्रसार माध्यमांना सांगितले.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट

हे पण वाचा- Video : नाचता नाचता गौतमी पाटीलचा पाय लचकला अन्…, दहिहंडी कार्यक्रमात तरुणांच्या काळजाचा ठोकाच चुकला!

कार्यक्रमात होणाऱ्या गोंधळ आणि भांडणाविषयी काय म्हणाली गौतमी?

“आज झालेल्या कार्यक्रमाचं नियोजन चांगलं होतं. कार्यक्रम खूप छान पार पडला. भांडण किंवा मारामारी आजच्या कार्यक्रमात काहीही घडलं नाही. मला नियोजन खूपच आवडलं. माझा कार्यक्रम म्हटलं की गडबड आणि गोंधळ, मारामारी असं होतं असंच सांगितलं जातं. मात्र माझ्या सगळ्याच कार्यक्रमात भांडण, मारामारी असे काही प्रकार होत नाहीत. पण काय होतं त्यावरुनच टार्गेट केलं जातं. मात्र माझ्या प्रत्येक कार्यक्रमात असं घडत नाही. याआधी जी बातमी समोर आली होती तो माझा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे तिथे तसं घडलं. मात्र प्रत्येक कार्यक्रमात असं घडत नाही.”

हे पण वाचा- गौतमी पाटीलच्या मुंबईतल्या कार्यक्रमात राडा, ‘हे’ वर्तन करणाऱ्या तरुणाला गर्दीने चोपलं

गौतमी पाटीलचा घुंगरु सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार

दोन महिन्यांनी माझा घुंगरु सिनेमा येणार आहे. सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा असं मी आवाहन करते आहे. तसंच एक गाणंही येणार आहे. मात्र ते काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही ते सरप्राईज असणार आहे असंही गौतमी पाटीलने यावेळी सांगितलं.