सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणारे लोक रात्रंदिवस मेहनत करून आपली स्वप्ने साकार करतात. सरकारी ऑफिसमध्ये काम संथ गतीने होते असे म्हणता येईल, पण ते सर्वत्र असचं असत नाही. नुकताच व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून याचा अंदाज येतो. या सरकारी ऑफिसमध्ये काम करणारा एक कर्मचारी फार वेगाने काम काम करताना दिसत आहेत. अलीकडेच, एक व्हायरल व्हिडीओ सध्या इंटरनेटवर घबराट निर्माण करत आहे. सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक व्हिडीओ व्हायरल होत असले तरी काही व्हिडीओ असे आहेत जे थक्क करणारे आहेत.

जिथे आता अनेक सरकारी कार्यालयांमध्ये लोक लवकर काम करण्यासाठी कॉम्प्युटरचा वापर करतात, तिथे काही सरकारी कार्यालये आहेत जिथे अजूनही जुन्या पद्धतीने काम केले जात आहे. नुकतच इंटरनेटवर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हाला हे समजणे कदाचित सोपे जाईल. व्हिडीओमध्ये एक माणूस मशीनच्या गतीने स्टॅम्प लावताना दिसत आहे. व्हिडीओतील व्यक्तीचा स्पीड पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

(हे ही वाचा: माकडांना फळ खाऊ घालत पोलिसाने जिंकली नेटीझन्सची मनं; व्हिडीओ सोशल मीडियावर viral)

(हे ही वाचा: वाघिण कुटुंबासह जंगलात निघाली फिरायला; जंगल सफारीदरम्यानचा Video Viral)

नेटीझन्सच्या प्रतक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @dc_sanjay_jas नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करणारे जिल्हाधिकारी संजय कुमार यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “जबाबदारीच आपल्याला ‘माणूस’मधून ‘मशीन’ बनवते! हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका यूजरने लिहिले, ‘केवळ जबाबदारी नाही…!! कार्यशैली, नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणा देखील आहे जे अशा प्रकारे काम करण्यास सक्षम आहेत.