scorecardresearch

Premium

बिबट्यानं केला हल्ला मात्र वाघानं वाचवला जीव, थरारक Video पाहून व्हाल अवाक्

Viral video: वन्य प्राणी हे जंगलीच असतात. ते कधी हल्ला करतील हे कोणीच सांगू शकत नाही. याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

tiger saves man from a leopard attack
चक्क वाघानं वाचवला तरुणाचा जीव

वन्य प्राणी जीवनाविषयी लोकांना कायमच आकर्षन असतं. प्राणी, त्याचं जगणं, त्यांचं दिसणं याविषयी प्रत्येकाला कुतुहल असतं. यासोबत प्राण्यांविषयी भीतीदेखील मनात असते. प्राण्यांना पाहण्यासाठी लोक खास जंगल सफारीसाठीही जातात. प्राण्यांचे अनेक हल्ल्याचे, शिकारीचे, भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यात जर पाहीलं तर वाघ हा अत्यंत आक्रमक प्राणी म्हणून ओळखला जातो. एका हल्ल्यात तो समोरच्या प्राण्याची चिरफाड करू शकतो. त्यामुळे वाघापासून चार हात लांब राहाणच बरं असं आपण म्हणतो, परंतु जर का तुमची याच वाघासोबत मैत्री झाली तर तुम्ही जणू जंगलाचे राजाच होता.

कारण वेळप्रसंगी वाघ तुमच्यासाठी हत्ती आणि सिंहाशी देखील पंगा घेऊ शकतो. विश्वास बसत नाहिये? तर मग हा व्हिडीओ पाहा, एक व्यक्ती पाठीमागे बिबट्या आणि समोर सिंह अशा स्थितीत अडकला होता. परंतु वाघानं मध्ये पडून त्याचे प्राण वाचवले. व्हिडीओ पाहून तुम्ही देखील दंगच व्हाल.

Reverse fatty liver easily What to eat, what not
मद्यपान न करताही यकृताला सूज येण्याचा धोका! डॉक्टर सांगतात, आहार कसा असावा? काय खावं, काय टाळावं?
video of family eating 3 course meal on train went viral
Viral video : पुलाव, पराठा, अन् लोणचं; रेल्वेमधील जेवणाचा राजेशाही थाट पाहून नेटकरी झाले थक्क! व्हिडिओ पाहून म्हणाले…
Attempt of self immolation Buldhana district
युवकांच्या ‘आत्मदहना’ने गाजला प्रजासत्ताकदिन! पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ!
Blindfolded man identifies his wife by just touching her hand
याला म्हणतात खरं प्रेम! डोळ्यावर पट्टी बांधलेली असतानाही फक्त हाताला स्पर्श करताच ओळखलं बायकोला, व्हिडीओ होतोय व्हायरल

वाघानं वाचवला तरुणाचा जीव

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सिंह आणि वाघांसोबत मस्ती करताना दिसत आहे. ती व्यक्ती फक्त त्यांच्या जवळच बसलेली नाही तर त्यांच्यासोबत खेळतानाही दिसत आहे. इतक्यात अचानक वाघ बिबट्या आणि माणसाच्या मध्ये येतो आणि बिबट्याला माणसावर झेप घेण्यापासून थांबवतो. प्रथमदर्शनी बिबट्या व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी धावत असल्याचं दिसतं, मात्र त्यानंतर हल्ला करण्याऐवजी तो तिथेच खेळू लागतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – आनंद महिद्रांनी ट्विटरवर Video शेअर करत दिला महत्त्वाचा मेसेज; म्हणाले, ”संकट की संधी…’

हा व्हिडीओ जुना असला तरी आता तो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ११ मिलियन व्ह्यूज गेले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tiger saves man from a leopard attack shocking video viral on social media srk

First published on: 27-05-2023 at 13:32 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×