नॉन व्हेज खाणाऱ्या माणसांना मासे खायला आवडतात, पण महासागराच्या पाण्यात असेही मासे आहेत ज्यांना माणसं खायला आवडतात. पण काही जणांना विनाशकारी विपरीत बुद्धी सुचते अन् होत्याचं नव्हतं होतं. व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करून लोकांच्या लाईक्स मिळवण्यात अनेकांना रस असतो. असाच एक भन्नाट व्हिडीओ काढणं एका व्यक्तीच्या अंगलट आलं आहे. एका स्कुबा डायव्हरने चक्क भल्या मोठ्या टायगर शार्कचा व्हिडीओ काढण्याचा प्लॅन केला. पण हा व्हिडीओ काढणं इतकं महाग पडेल, याचा विचारंही त्यानं केला नसेल.

पाण्यातील सर्व विश्व आपलंच, जणू काही अशाच अविर्भावात काही स्कुबा डायव्हर राहत असतात. मग पाण्यात जीवघेणा शार्क मासा समोर आला, तरीही ते त्यांच्याच संभ्रमात राहतात. कारण महासागराच्या खोल पाण्यात जाऊन एकाने अंडरवॉटर कॅमेराच्या माध्यमातून टायगर शार्कचा व्हिडीओ काढण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर पाण्यात पोहणाऱ्या शार्कने कॅमेऱ्यावर मोठा हल्ला केला. शार्क माशाने कॅमेरा दाताने तोडून गिळण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

नक्की वाचा – नादच केला पठ्ठ्यानं! चक्क किंग कोब्रालाच घातली आंघोळ, श्वास रोखून धरणारा असा Viral Video यापूर्वी पाहिला नसेल?

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ UOldguy नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. युजरने कॅप्शन मध्ये म्हटलंय, टायगर शार्कने गो प्रो खाण्याचा प्रयत्न केला. शार्कने धारदार दातांनी कॅमेरा तोडण्याचाही प्रयत्न केला. पण या व्हिडीओच्या माध्यमातू शार्कचे धारदार दात, घसा आणि शरीरातील अवयव या फुटेजच्या माध्यमातून पाहता आले. ट्विटर हॅंडलनेही @zimdakid नावाच्या सिनेमॅटोग्राफरला श्रेय दिलं आहे. शार्कने कॅमेरा गिळण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर पुन्हा वाळूत सोडून तो निघून गेला.