Top Google Search List of 2024: पूर्वी कुणालाही काही प्रश्न पडला तर आधी माहितगार व्यक्ती आणि नंतर ग्रंथालयांमध्ये पुस्तकं चाळली जात असत. त्यातूनही उत्तरं मिळाली नाहीत, तर अनेकदा असे प्रश्न अनुत्तरितच राहात असत. मग कालांतराने त्यावर सखोल अभ्यास होऊन त्याचं उत्तर मिळत असे. पण इंटरनेटच्या जगात जवळपास कोणत्याही प्रश्नाचं उत्तर एका क्लिकवर मिळू लागलं. यालाच इंटरनेट क्रांती म्हटलं गेलं. युजर्सला काहीही प्रश्न पडला की सर्वात आधी गुगलला विचारलं जातं. आता तर एआयच्या काळात चॅटजीपीटीसारखे पर्यायही उपलब्ध झाले आहेत. पण अजूनही नेटिझन्सचा गुगलवरचा भरवसा कमी झालेला नाही. याची वार्षिक माहिती नुकतीच समोर आली असून २०२४ मध्ये वर्षभरात भारतीय युजर्स इंटरनेटर काय शोधत होते, याबाबतच्या तपशीलाचा यात समावेश आहे.

गुगलच्या ‘इयर इन सर्च’ रिपोर्ट नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये वर्षभरात गुगलवर भारतातून सर्च झालेल्या अर्थात शोधल्या गेलेल्या सर्वाधिक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक शोधल्या गेलेल्या पहिल्या १० मुद्द्यांमध्ये भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन पक्षांचाही समावेश आहे!

maha kumbha mela 2025 khoya paya kendra funny video
VIDEO : “ऐ राजू, हम ढूंढ रहे है रे बाबू…”, महाकुंभ मेळ्यात हरवलेल्या लोकांसाठी होतायत अशा घोषणा की, ऐकून पोट धरून हसाल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Hindenburg Research winds down
Hindenburg Research : अदाणी समूहाबाबत अहवाल देऊन खळबळ माजवणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चला कुलूप, संस्थापकांनी लिहिली भावूक पोस्ट
Ramesh Bidhuri on Delhi CM Atishi
Ramesh Bidhuri : “दिल्लीच्या रस्त्यांवर हरिणीप्रमाणे…”, भाजपाच्या रमेश बिधुरींचं पुन्हा मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
PM Modi-Omar Abdullah
PM Modi-Omar Abdullah : PM मोदी आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यातील मैत्री वाढली? झेड-मोढ बोगद्याच्या उद्घाटनावेळी नेमकं काय घडलं?
What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
selection process for next chief election commissioner
अन्वयार्थ : सरकारी खातेच जणू…

१. इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल

भारतीयांचं क्रिकेट प्रेम जगविख्यात आहे. त्यात आयपीएलनं भारतीय क्रिकेटप्रेमींवर चांगलंच गारूड केलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून आयपीएलबाबत भारतीयांनी गुगलवर या वर्षी सर्वाधिक सर्च केल्याचं दिसून आलं. त्यात आपली आवडती टीम, खेळाडू, लिलावाची माहिती अशा गोष्टी युजर्सनं सर्च केल्या.

२. टी-२० वर्ल्डकप

यंदाच्या वर्षी टीम इंडियानं तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा टी-२० वर्ल्डकप जिंकला. त्यामुळे साहजिकच यासंदर्भातल्या सर्चचा या यादीत दुसऱ्या स्थानी समावेश झाला आहे. यात प्रामुख्याने सामन्याचे ताजे अपडेट्स, भारतीय खेळाडूंची कामगिरी आणि सामन्याबाबतचे अंदाज या बाबी चर्चेत राहिल्या.

३. भारतीय जनता पार्टी

क्रिकेटनंतर भारत व भारतीयांसाठी हे वर्षं महत्त्वाचं ठरलं ते राजकारणाच्या दृष्टीने. यंदाच्या वर्षी भारतात लोकसभा निवडणुकांबरोबरच महाराष्ट्रासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही पार पडल्या. यानिमित्ताने या निवडणुकांमध्ये केंद्रस्थानी राहिलेला भारतीय जनता पक्ष हा गुगल सर्चच्या यादीतही तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याचं दिसत आहे. भाजपा नेते, भाजपाची धोरणं, निवडणूक कामगिरी या बाबी राजकीय वर्तुळाप्रमाणेच गुगलवरही चर्चेत राहिल्या.

Google Search: शाहरूख खान म्हणाला, “मला ओळखत नसाल तर गुगल करा”, आता गुगलने दिली खास प्रतिक्रिया, वाचा काय घडलं?

४. निवडणूक निकाल २०२४

यंदाच्या निवडणुकीत एनडीएची मोठी पीछेहाट झाल्यामुळे या निवडणुकीचे निकाल चर्चेचा विषय ठरले होते. त्यामुळे गुगल सर्चमध्ये यंदाचे निवडणूक निकाल चौथ्या स्थानी राहिले.

५. ऑलिम्पिक २०२४

क्रिकेट आणि राजकारणाबरोबरच भारतात ऑलिम्पिकबाबतची माहिती युजर्सनं मोठ्या प्रमाणावर सर्च केल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीकडे साऱ्या भारतीयांचं लक्ष होतं. त्यातही विनेश फोगट, नीरज चोप्रा यांची कामगिरी, भारतीय खेळाडूंनी मिळवलेली पदकतालिका अशा बाबी चर्चेत राहिल्या.

६. वाढती उष्णता

यंदाच्या वर्षी देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे उष्णतेची ही परिस्थिती कशी हाताळावी आणि त्यावर काय उपाय करावेत याबाबत भारतीयांनी गुगलवर मोठ्या प्रमाणावर माहिती शोधल्याचं पाहायला मिळालं.

७. रतन टाटा

सुप्रसिद्ध भारतीय उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानं सर्वच स्तरातील त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न गुगलवर मोठ्या प्रमाणावर झाल्याचं पाहायला मिळालं.

८. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – आयएनसी

लोकसभा व काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाप्रमाणेच काँग्रेसही युजर्सच्या उत्सुकतेचा विषय ठरला. काँग्रेस पक्षाचं नेतृत्व, निवडणूकविषयक धोरणं, अंतर्गत बदल अशा अनेक बाबी युजर्सनं यावर्षी सर्च केल्या. विशेषत: लोकसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडी आणि त्यातील काँग्रेसची भूमिका या बाबी विशेष चर्चेच्या ठरल्या.

९. प्रो कबड्डी लीग – पीकेएल

क्रिकेट आणि ऑलिम्पिकप्रमाणेच प्रो कबड्डी लीगनंही भारतात आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे सर्वाधिक गुगल सर्चच्या यादीत प्रो कबड्डी लीगचा नवव्या क्रमांकावर समावेश झाला आहे.

१०. इंडियन सुपर लीग – आयएसएल

क्रिकेट, कबड्डीपाठोपाठ भारतात फुटबॉलचाही मोठा चाहता वर्ग असल्याचं या वर्षीच्या गुगल सर्च यादीवरून दिसून येत आहे. सर्वाधिक शोधल्या गेलेल्या गोष्टींमध्ये इंडियन सुपर लीग दहाव्या स्थानी आहे. त्यात खेळाडूंची माहिती, संघांची माहिती, सामन्यांचं वेळापत्रक अशा बाबी युजर्सकडून शोधल्या जात होत्या.

Story img Loader