scorecardresearch

रोजंदारी करणारा मजूर एका रात्रीत १०० कोटींचा मालक बनला तरी कसा? आता मागे लागला पोलिसांचा ससेमिरा कारण…

सध्याच्या डिजिटल जमान्यात तर अनेकजण रात्रीत करोडपती झाल्याचं आपण पाहिलं आहे.

west bengal laborers viral news
मजूर रात्रीत बनला १०० कोटींचा मालक. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कोणाचे नशीब कधी पालटेल हे सांगता येत नाही. शिवाय सध्याच्या डिजिटल जमान्यात तर अनेकजण ऑनलाईन गेमिंगमुळे तर ऑनलाईन लॉटरीमुळे रात्रीत करोडपती झाल्याचं आपण पाहिलं आहे. सध्या असाच काहीसा प्रकार पश्चिम बंगालमधील एका मजुराच्या बाबतीत घडला आहे. हा मजूर रात्रीत १०० कोटींचा मालक बनला आहे. पण या पैशांमुळे आता त्याची झोप उडाली आहे. रात्रीत करोडपती झालेल्या मजुराचे नाव मोहम्मद नसीरुल्लाह मंडल असं आहे.

विशेष म्हणजे मजूर नसीरुल्लाह याला त्याच्या बँक खात्यात १०० कोटी रुपये जमा झाल्याची माहिती नव्हती. सायबर सेलची नोटीस आल्यानंतर त्याला खात्यात पैसे जमा झाल्याचं समजलं. मिळालेल्या माहितीनुसार, देडाना सायबर सेलने मोहम्मद नसीरुल्लाह मंडल यांना या पैशांबाबतच्या चौकशीसाठी ३० मे रोजी बोलावलं आहे.

हेही पाहा- मोलकरणीने लघवीने पुसलं मालकाचं घर, CCTV मुळे झाला खुलासा, पोलिसांना म्हणाली, “मी काम…”

पैसे जमा होताच टेन्शन वाढलं –

या प्रकरणी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बासुदेबपूर गावात राहणाऱ्या मोहम्मद नसीरुल्लाह मंडल यांनी सांगितलं, “पोलिसांचा फोन आल्यानंतर माझी झोप उडाली. मी काय केले ते मलाच माहीती नव्हते, सुरुवातीला माझ्या बँक खात्यात १०० कोटी रुपये जमा झाल्याच्या गोष्टीवर माझा विश्वास बसला नाही. मी पुन्हा पुन्हा खाते तपासल्यानंतर खात्यात १०० कोटी जमा झाल्याचं दिसल. तसेचं पंजाब नॅशनल बँकेत माझे अकाऊंट आहे. या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी मी पीएनबीच्या शाखेत गेलो, त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी, खाते ब्लॉक करण्यापूर्वी त्यामध्ये केवळ १७ रुपये होते असं सांगितलं.”

हेही पाहा- आनंद महिद्रांनी ट्विटरवर Video शेअर करत दिला महत्त्वाचा मेसेज; म्हणाले, ”संकट की संधी…’

मजुराने पुढे सांगितले, “जेव्हा मी माझे Google Pay तपासले तेव्हा त्यामध्ये सात अंक दिसले. हे पैसे माझ्या खात्यात कसे आले हे मी सांगू शकत नाही. मी रोजंदारी कामगार म्हणून काम करतो. पोलिसांकडून माझ्यावर कारवाई होण्याची किंवा मारहाण होण्याची भीती असून यामुळे माझे कुटुंबीय चिंतेच आहेत.” दरम्यान, या मजुराचे बँक खाते तात्पुरते निलंबित करण्यात आले असून बँक अधिकार्‍यांनी त्याच्या बँक खात्याती जमा झालेल्या पैशांमुळे त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 12:26 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या