Viral Video : पती पत्नीचे नाते हे जगावेगळे असते. लग्नानंतर दोन व्यक्ती एकत्र येऊन नवीन आयुष्याची सुरूवात करतात. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात. एकमेकांच्या सुख दु:खात कायम बरोबर राहतात. या नात्यात एक वेगळे प्रेम आणि जिव्हाळा पाहायला मिळतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती व्हीलचेअरवर बसलेल्या त्याच्याा पत्नीबरोबर डान्स करताना दिसत आहे. त्याचे पत्नीबाबत असलेले प्रेम पाहून तुम्हीही भारावून जाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात अनेक जोडपे डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची नजर एका जोडप्यावर जाईन. एक व्यक्ती त्याच्या पत्नीबरोबर डान्स करताना दिसत आहे. पत्नी व्हीलचेअरवर बसलेली दिसत आहे आणि पती तिच्याबरोबर डान्स करताना दिसत आहे. ते डान्स करताना मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. त्यांच्या डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हीलचेअरवर बसलेली पत्नी उभी राहून डान्स करू शकत नाही म्हणून पतीने चक्क व्हीलचेअरसह पत्नीबरोबर डान्स करताना दिसतो. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नवरा होणे सोपी आहे पण प्रियकर होणे खूप कठीण आहे” या व्हिडीओवर ‘जब कोई बात बिघड जाये” हे एक सुंदर गाणे लावले आहेत.

हेही वाचा : VIDEO : अयोध्येतील हा कावळा ‘राम राम’ म्हणतोय; व्हिडीओ पाहून अवाक् व्हाल

iamrjharsh या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कालपर्यंत मला वाटायचे की हे गाणे लग्नात बॅन झाले पाहिजे. जेव्हा या गाण्यावर लग्नात कपल डान्स बंद होणार तेव्हा देश विकसित होईल. पण काल या दोघांना डान्स करताना पाहून या गाण्याच्या प्रेमात पडलो.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपल्या लोकांबरोबरचा सुंदर क्षण” तर एका युजरने लिहिलेय, “इंस्टाग्रामवरील आजवरचा सुंदर व्हिडीओ” आणखी एका युजरने लिहिलेय, “
याला म्हणतात खरं प्रेम” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: True love couple dance a husband dance with wife sitting on wheelchair emotional video goes viral on social media ndj
First published on: 06-02-2024 at 11:57 IST