‘बाहुबली २’ विषयी सगळीकडे प्रचंड उत्सुकता आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारलं? (का?) या प्रश्नाचं उत्तर मिळवायला सगळे सिनेरसिक अगदी आतुर झाले आहेत. नुकतंच ‘बाहुबली २’ ट्रेलर रिलीज झालं. त्यामधल्या प्रत्येक फ्रेमची चर्चा होतेय. मग कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाचं उत्तरही या ट्रेलरमधून ‘गवसत’ वगैरे असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. सत्यजित रे आज असते तर सिनेमाबाबत एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी चिकित्सा पाहून भरून पावले असते.

ट्विटरकरांनी मात्र या ट्रेलरमधली एक फ्रेम मस्त पकडली आहे. आणि आता या फ्रेमवरून धुमाकूळ सुरू आहे.

१. जेव्हा मी माझ्या गर्लफ्रेंडला घरी बोलावतो तेव्हा शेजाऱ्यांचे चेहरे हे असे होतात….

सौजन्य-ट्विटर

 

२. पिझ्झा डिलिव्हरी बाॅय माझ्या घरी येत असताना काॅलनीवाल्यांची रिअॅक्शन

सौजन्य-ट्विटर

 

३. गोवा ट्रिप कॅन्सल?

सौजन्य-ट्विटर

 

४. यूपी इलेक्शननंतरची काँग्रेस आणि समाजवादी पार्टी</strong>

सौजन्य-ट्विटर

पण बाकी बाहुबली-२ ने जाम हवा निर्माण केली आहे. प्रभासवर देशभरातल्या तरूणींचे उसासे घेत आहेत तर अनुष्का शेट्टीही खूप देखणी दिसत असल्याने तिच्या लूकविषयीही खूप चर्चा होतेय. बाकी सिनेमाचं म्युझिक, स्पेशल इफेक्टची बातच वेगळी!

वाचा- नुकसानभरपाई म्हणून कोर्टाने एक्सप्रेसगाडी शेतकऱ्याच्या नावे केली!

आणि हे सगळं घेऊन ‘बाहुबली-२’ २८ एप्रिलला बाॅक्स आॅफिसवर मोठा धमाका करणार आहे.