Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ तर अत्यंत धक्कादायक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओमध्ये कॅनडामधील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक उबर ड्रायव्हर एका महिलेशी संवाद साधत आहे. व्हिडीओमध्ये ड्रायव्हर असा काही बोलतो की चर्चेचा विषय ठरतो. कॅब ड्रायव्हर महिलेला म्हणतो, “तुम्ही जर पाकिस्तानात असता तर मी स्वत:तुम्हाला किडनॅप केले असते, कारण दुसरा पर्याय नाही.”
हा व्हिडीओ ड्रायव्हर पाकिस्तानी असून कॅनडामध्ये ड्रायव्हिंगचे काम करतो, असा प्राथमिक अंदाज आहे. (Canada Toronto Uber driver told female passenger if she was in Pakistan he would kidnap her)

हा व्हायरल व्हिडीओ एका कॅबमधील आहे. व्हिडीओमध्ये एक महिला कॅब ड्रायव्हरशी संवाद साधताना दिसत आहे. या दरम्यान कॅब ड्रायव्हर महिलेला म्हणतो की जर ती पाकिस्तानात असती तर तिला किडनॅप केले असते. मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ कॅनाडातील टोरंटो येथील आहे. व्हिडीओत ड्रायव्हर महिलेला म्हणतो, “तुम्ही जर पाकिस्तानात असता तर मी तुम्हाला किडनॅप केले असते. कारण माझ्याजवळ तुम्हाला प्राप्त करण्याचा दुसरा पर्याय नसता” विशेष म्हणजे यावर महिला हसताना दिसत आहे पण व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा ड्रायव्हर मजेशीरपणे असे बोलत असावा, असा अंदाज आहे. पण सोशल मीडियावर नेटकऱ्यांना असे बोलणे आवडलेले दिसत नाही. नेटकरी त्याच्यावर जोरदार टिका करताना दिसत आहे.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
Passengers Inside Patna To Kanpur Train over seat issues
हद्दच झाली! ट्रेनमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Man was trying to bullying a child instead of this child beaten him video
“वय नाही हिम्मत लागते” भर बाजारात कॉलर पकडणाऱ्याला एकटा भिडला चिमुकला, VIDEO पाहून कराल कौतुक
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट

हेही वाचा : VIDEO : बॉयफ्रेंडला भेटायला बोलावणे तरुणीला पडले महागात, मुलाच्या आईचा भर रस्त्यात राडा, व्हायरल होतोय व्हिडीओ

पाहा व्हायरल व्हिडीओ

https://x.com/TRIGGERHAPPYV1/status/1790411956337152038

हेही वाचा : हेल्मेट न घालता गाडी चालवता? बघा पोलीस एकाचवेळी अनेकांचे ऑनलाईन चलान कसे कापतात; VIDEO पाहून बसेल धक्का

Crime Net या एक्स अकाउंटवरून 14 मे ला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहे. अनेक युजर्सनी या ड्रायव्हरच्या विरोधात तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने लिहिलेय, “या ड्रायव्हरला पाकिस्तानात परत पाठविले पाहिजे तर एका युजरने लिहिलेय, “पूर्ण क्लिप व्हायरल झाली नाही त्यामुळे कदाचित होऊ शकते की ही व्यक्ती मजेशीरपणे बोलली असावी.” आणखी एका युजरने लिहिलेय, “असं कोणी कसं काय म्हणू शकतं”