‘मुलं लहान आहेत, त्यांना दम भरला की ती शांत बसतील’ असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते दिवस आता जुने झालेत बरं का! कारण आजची पिढी स्मार्ट आहे आणि त्यांना जशास तसे उत्तर द्यायला आवडतं. असाच शालेय विद्यार्थ्यांच्या बंडखोरीचा अनुभव लंडनमध्ये आला. उन्हाचा फारच त्रास होत असल्याने विद्यार्थी शाळेत तोकड्या पँट घालून येत होते. त्यानंतर शाळेने ‘ड्रेस कोड’ जारी केला. खरं तर उन्हाचे दिवस असल्याने तोकड्या पँट घालून येण्याची परवानगी त्यांनी मागितली. पण ‘तुम्हाला एवढंच गरम होत असेल, तर स्कर्ट घालून शाळेत या’ असा सल्ला शिक्षिकेने दिला. अर्थात शिक्षक उपरोधिकपणे असं म्हणाले होते.

Viral Video : अपघात पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

तेव्हा यातल्या एका मुलाने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलांची मागणी रास्त होती, पण जर तोकड्या पँट घालून आलात तर तुमचं एका आठड्यासाठी निलंबन करण्यात येईल असंही शाळेने सांगितले. तेव्हा शाळेच्या ड्रेस कोड विरोधात बंड करण्याची अनोखी कल्पना त्यांना सुचली. आपल्या पालकांच्या मदतीने त्यांनी ड्रेस कोडविरोधात अनोखा लढा सुरू केला. ISCA Academy चे पाचही विद्यार्थी चक्क स्कर्ट घालून शाळेत पोहोचले. तसा शाळेतल्या शिक्षिकेने स्कर्ट घालून येण्याचा सल्ला दिलाच होता. तेव्हा याचा शब्दश: अर्थ काढत हे विद्यार्थी मुलींचा गणवेश घालून शाळेत पोहोचल. त्याच्या या लढ्यात इतर विद्यार्थीही सहभागी झाले. विद्यार्थ्यांना असं पाहून शिक्षकही आश्चर्यचकित झाले.पण गरमीमुळे मुलांना होणारा त्रास लक्षात घेऊन शाळेनेही नंतर नरमाईची भूमिका घेतली आहे. पालकांशी बोलून मुलांच्या कर्म्फर्टचा विचार करण्यात येईल असं शाळेने सांगितले.

Viral : ‘I have boyfriend’ म्हणणाऱ्या मुलींनो जरा हा व्हिडिओ पाहाच!