Viral Video : उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी उखाणा घेतला जातो. नवरा बायको लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेतात.पूर्वी फक्त महिलाच उखाणा घ्यायच्या पण आता पुरुष सुद्धा हौशीने उखाणा घेताना दिसतात. सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही लोक उखाण्यातून प्रेम व्यक्त करतात तर काही लोक उखाण्यातून त्यांची प्रेमकथा सांगतात. काही लोक जोडीदाराच्या तक्रारी तर काही लोक मजेशीर ज्योक्स सांगतात. कधी भावूक करणारे तर कधी खळखळून हसवणारे उखाणे सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

सध्या असाच एक थक्क करणारा उखाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने त्याच्या पत्नीसाठी सुंदर उखाणा घेतला आहे. त्याचा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. उखाण्यात त्याने विठोबा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासह पत्नीचे नाव सांगितले आहे. त्यानंतर पुढे त्याची पत्नी सुद्धा उखाणा घेते. नवविवाहित जोडप्याचे उखाणे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

Woman fulfills Bollywood dream by dancing to Sridevi song
श्रीदेवीप्रमाणे साडी नेसून बॉलीवूड गाण्यावर महिलेने केला डान्स, लेकाने पूर्ण केले आईचे स्वप्न! पाहा Viral Video
snake attack on a man wrap around door handle
जरा सांभाळून! दरवाज्याचे हँडल पकडताच सापाने केला हल्ला, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
KKR Seo on Rohit Sharma Abhishek Nayar Viral Video
IPL 2024: रोहित शर्मा-अभिषेक नायर ‘त्या’ व्हायरल व्हीडिओमध्ये नेमकं काय बोलत होते? KKR च्या सीईओने केला खुलासा
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
ukhana video a newlywed man said ukhana for wife
“बायकोसमोर सोनं आहे लोखंड..” नवऱ्याचा भन्नाट उखाणा अन् नवरी लाजली, VIDEO होतोय व्हायरल
Sreesanth lied about sanju samson to Rahul Dravid Video
VIDEO: संजू सॅमसनचं आयुष्य बदलून टाकणारं श्रीशांतचं ते वाक्य
Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल

तरुणाने घेतला पत्नीसाठी सुंदर उखाणा

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक नवविवाहित जोडपे बसलेले दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तरुण पत्नीसाठी उखाणा घेतो. उखाणा घेताना तो म्हणतो, “पंढरीचा राजा विठोबा सावळा, दिक्षाचं नाव घेतो छत्रपतीचा मावळा…” उखाण्यामध्ये हा तरुण पंढरपूरच्या विठूमाऊलीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो. अनेक विठ्ठलभक्त आणि शिवप्रेमींना हा उखाणा आवडेल. त्यानंतर त्याची पत्नी सुद्धा सुंदर उखाणा घेताना दिसते. ती उखाणा घेताना म्हणते, “चांदीची समई त्याला सोन्याच्या वाती, अक्षय रावांचं नाव घेते ते माझे पती मी त्यांची सौभाग्यवती” या नवविवाहित जोडप्याचा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Optical Illusion : फोटोमध्ये कॅसेट्स दिसताहेत का? पण त्या कॅसेट्स नव्हे! फोटो एकदा नीट क्लिक करून पाहा

पाहा व्हायरल व्हिडीओ

maharashtraweddings.in या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “उखाणा” सोशल मीडियावर असे अनेक उखाण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.