सध्या सर्वांनाच सेल्फीचे वेड लागले आहेत. पण सेल्फी कधी काढावी याचे भानही या सेल्फीवेड्या मंडळींना  राहिलेले नाही. उत्तरप्रदेशमध्ये असाच एक प्रकार समोर आला असून लखनौमध्ये महिला पोलिसांनी रुग्णालयामध्ये अॅसिड हल्ल्यातील पीडितेसोबत सेल्फी काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर येताच संबंधित महिला पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लखनौमधील किंग जॉर्ज मेडिकल विद्यापीठाच्या रुग्णालयात अॅसिड हल्ल्यातील एका पीडितेवर उपचार सुरु आहेत. या पीडितेच्या बेडजवळ बसलेल्या तीन महिला पोलीस सेल्फी काढतानाचा फोटो समोर आला होता. सोशल मीडियावरही हा फोटो व्हायरल झाला असून अनेकांनी महिला पोलिसांच्या असंवेदनशीलतेवर टीका केली होती. शेवटी उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलीस महासंचालक सतीश गणेश यांनी फोटोमधील तिन्ही महिला पोलिसांच्या चौकशीचे आदेश दिले आहे. महिला पोलिसांचे कृत्य हे असंवेदनशील असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. प्राथमिक चौकशीनंतर प्रशासनाने रजनीबाला सिंह आणि डेजी सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर तिसऱ्या महिला पोलिसाची चौकशी सुरु आहे.  चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.

अलाहाबाद- लखनौ गंगा गोमती एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला दोन अज्ञात व्यक्तींनी अॅसिड पिण्यास भाग पडले होते. महिलेवर हल्ला करणाऱ्या गुंडांनी यापू्र्वीही अॅसि़ड हल्ले केले आहेत. या नराधमांनी लक्ष्य केलेली ही चौथी महिला आहे. यापूर्वी त्यांनी लखनौजवळच एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. या महिलेवरही बलात्कारानंतर अॅसिड हल्ला झाला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up female cops who took selfies with acid attack in lucknow hospital victim suspended
First published on: 25-03-2017 at 12:16 IST