Funny Answer Sheet: परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात महत्वाचा भाग असतो. या परीक्षेत विद्यार्थी अनेक वेळा विचारलेल्या प्रश्नांना चमत्कारीक उत्तर देत असतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच प्रश्नाचे उत्तर व्हायरल होत आहे. हे उत्तर वाचून तुम्हालाही धक्का बसणार आहे. तुम्हाला हासावे की खेद व्यक्त करावा, हे समजणार नाही. या मुलाची उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे. उत्तर प्रदेशात एका विद्यापीठात असा प्रकार घडला. एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत प्रश्नाचे उत्तर लिहिण्याऐवजी ‘जय राम जी’ आणि क्रिकेटपटूंची नावे लिहिली. इथपर्यंत सर्व समजू शकतो पण या विद्यार्थ्यांला परीक्षेत उत्तीर्ण घोषित करण्यात आल्यानंतर सर्व प्रकार गंभीर बनत केला.

उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील पूर्वांचल विश्वविद्यालयातून अजब प्रकरण समोर आलं आहे. फार्मसीच्या विद्यार्थ्याने परीक्षेतील एका पेपरमध्ये उत्तराच्या जागी ‘जय श्रीराम’ लिहिलं. तसेच क्रिकेटपटूंची नावे लिहिली. तरीही हा विद्यार्थी या पेपरमध्ये ५६ टक्के गुण मिळवून पास झाला. दरम्यान हा सगळा प्रकार कशापद्धतीनं समोर आला हे पाहुयात.

३ ऑगस्ट २०२३ रोजी एका विद्यार्थ्याने डी-फार्माच्या पहिल्या सेमेस्टरची परीक्षा झाल्यानंतर १८ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका फेरतपासणी करण्याची मागणी केली होती. विद्यापीठातील दोन प्राध्यापक विनय वर्मा आणि आशिष गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप दिव्यांशुने केला होता. यानंतर प्रकरणाची चर्चा राज्यभरात झाली. त्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या वादग्रस्त उत्तरपत्रिका काटेकोरपणे तपासण्यात आल्या. त्या उत्तरपत्रिकांमध्ये ‘जय राम जी’ अशा घोषणा आणि रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या यांसारख्या क्रिकेटपटूंची नावे लिहिल्याचे समोर आले.

दोषी प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई

प्रश्नाचे उत्तर लिहिण्याऐवजी विद्यार्थ्यांनी भलतेच काहीतरी लिहिले होते. असे असतानाही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाल्याचे निष्पन्न झाले होते.दिव्यांशुच्या तक्रारीची राजभवनाकडून दखल घेण्यात आली. यानंतर दोषी प्राध्यापकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली.

पाहा उत्तरपत्रिका

हेही वाचा >> “शेती पाहिजे पण शेतकरी नको” नवरदेवानं भरचौकात पोस्टरवर लिहला भन्नाट टोला; Photo पाहून कराल कौतुक

ही पोस्ट हजारो जणांनी पाहिली असून त्याला लाइक केले आहे. त्यावर अनेक प्रकारच्या कॉमेंट आल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, भविष्यातील आयएएस अधिकारी. दुसरा म्हणतो, असे कितीतरी विद्यार्थ्यांकडून यांनी लाच घेतली असेल.