Vande Bharat Loco Pilot Crying At Retirement Day : निवृत्ती हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत कठीण क्षण असतो. काही जण स्वखुशीने निवृत्ती स्वीकारतात, तर काहींना वयानुसार सेवेतून निवृत्त व्हावे लागते. पण, निवृत्तीचा दिवशी तुम्ही अनेकांना भावूक झाल्याचे पाहिले असेल. कारण गेली कित्येक वर्ष तुम्ही ज्या ठिकाणी काम करत होता, ते काम आता करता येणार नाही. अनेक जण कंपनीच्या कामावर टीका करतात, पण निवृत्तीचा दिवस येतो त्यावेळी कामाच्या ठिकाणाहून पाय निघत नाही, मन भरून येते. अशाच वंदे भारत ट्रेनच्या लोको पायलटचा सेवानिवृत्तीचा भावूक करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हालादेखील अश्रू अनावर होतील.

भारतीय रेल्वेत ३५ वर्षे लोको पायलट म्हणून काम करणारे किशन लाल मार्च २०२४ मध्ये निवृत्त झाले. या आनंदाच्या प्रसंगी किशन लाल चेन्नईहून ट्रेनने बेंगळुरू स्टेशनवर पोहोचले. यावेळी त्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांनी फुलांचे हार आणि भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत केले.

PHOTO : मेट्रो ट्रेनमधील ‘ते’ दृश्य पाहून युजर्सचा संताप; म्हणाले, त्या व्यक्तीला शोधा आणि…

किशन लाल यांच्यासाठी हा खूप भावनिक क्षण होता, त्यांना त्यांचे आनंदाश्रू आवरता आले नाहीत. यावेळी त्यांनी आपल्या मित्रपरिवारासह रेल्वेस्थानकावरच बँडबाजाच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटला. अशाप्रकारे आनंदाश्रूंसह किशन लाल यांचा निवृत्तीचा क्षण नेहमी आठवणीत राहील असा साजरा करण्यात आला.

पाहा व्हिडीओ

@railfan_pavan नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, निवृत्तीच्या शुभेच्छा किशन लाल सर LP/MAIL/SBC. सर, भारतीय रेल्वेमधील तुमच्या अप्रतिम सेवेबद्दल धन्यवाद, आम्हाला तुमचा अभिमान आहे, तुमचे सेवानिवृत्त जीवन उत्तम जावो, बेंगळुरूच्या सर्वोत्कृष्ट लोको पायलटपैकी तुम्ही एक आहात सर, आम्हाला तुमची आठवण येईल. मनःपूर्वक शुभेच्छा सर. किशन लाल सरांनी शेवटचे SBC-MAS-SBC वंदे भारत एक्सप्रेस 20608/20607 चे काम केले होते.”

सोशल मीडिया युजर्सनी पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये किशन लाल यांना शुभेच्छा दिल्या, तर अनेकांना त्यांचा सेवानिवृत्तीचा व्हिडीओतील क्षण पाहून आपले अश्रू आवरता आले नाहीत.