चोरी करण्याच्या अनोख्या पद्धतींबाबत आपण अनेकदा ऐकतो. कधी चोर कोणत्या तरी वेशात येतो तर कधी आणखी काही. अशाच चीनमधील एका चोरीचा व्हिडियो नुकताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये चोर ज्वेलरीच्या दुकानात नेमका कसा जातो हे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या दुकानात घुसून चोराने काही मिनिटांत ३५ लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून चीनमधील दोनगुआन शहरात ही घटना घडली. सोशल मीडियावरही हा व्हिडियो व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा चोर दुकानाचे शटर तोडून रात्रीच्या वेळी दुकानात घुसला. रस्त्यावर आजुबाजूला कोणीच नाही याकडे त्याने लक्ष ठेवले असावे. दुकानात जास्त किंमतीची ज्वेलरी आहे हे त्याला माहित असल्याने त्याने आपल्याजवळ हे दागिने आणण्यासाठी मोठी कॅरीबॅगही आणली होती. आत शिरल्यानंतर त्याने सगळ्यात पहिल्यादा अलार्म बंद केला. मग डिस्प्लेला ठेवण्यात आलेले दागिने त्याने आपल्या जवळच्या कॅरीबॅगमध्ये टाकले. यात ४० ब्रेसलेट, नेकलेस, कानातले, डायमंडच्या अंगठ्या या गोष्टींचा समावेश होता. दुसऱ्यादिवशी सकाळी दुकान मालकांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी त्याबाबत तक्रार नोंदवली. चोराचा शोध सुरु असल्याचे येथील स्थानिक पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video cctv footage how thief enter into jewellery store through narrow gap
First published on: 22-05-2018 at 12:26 IST