Viral Video Today: आपल्या मर्यादा सोडून देणे, इतरांच्या प्रायव्हसीचा विचार न करणे हे माणसाचे अलीकडे गुणधर्मच झाले आहेत. असं वागल्यावर कदाचित काही सेलिब्रटी माफ करतीलही पण प्राण्यांचा नाद करायला गेलात तर ते अक्षरशः उताणं करून जीवही घेऊ शकतात. समस्त प्राण्यांच्या वतीने कदाचित या व्हायरल व्हिडिओमधून एका गोरिलाने माणसाला अशी ताकीदच दिली आहे. कदाचित प्रायव्हेट क्षणी माणूस शूटिंग करताना दिसताच गोरिला इतका भडकला की त्याने माणसाला उलटं करून त्याचे पाय धरून जोरात ओढले. हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तुम्ही ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर जंगलात गोरिलाचे व्हिडीओ शूटिंग करत होता. यावेळी गोरिलाला त्याची चाहूल लागली आणि तो चिडला. तुम्ही बघू शकता की, या व्हिडिओमध्ये दोन गोरिला दिसत आहेत. व्हिडीओग्राफर बघताच एक गोरिला तिथून निघतो, बहुधा ही मादी असावी आणि दुसरा गोरिला मागून चालत येतो. आधी तर हा प्राणी शांत दिसतो पण तेवढ्यात तो फोटोग्राफरचा पाय धरून जोरात ओढतो. जंगलाच्या दिशेने घेऊन जाताना बाकीच्या टीमची चांगलीच धांदल उडते.

गोरिलाने पाय धरला अन् ओढत नेलं…

हे ही वाचा<< Video: ३७ सेकंदात जमिनीने गिळलं संपूर्ण शेत; सिंकहोलने होणार पृथ्वीचा अंत? स्वतः पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की सुदैवाने त्या गोरिलाने केवळ सूचना देऊन या माणसाला सोडून दिलं आहे. हा धक्कादायक व्हिडिओला तब्बल ८९ लाख लोकांनी पहिला आहे तर याला ८६ हजाराहून अधिक लाईक्स आहेत. यावर काहींनी तर्क-वितर्क लावण्यापासून ते उपाय देण्यापर्यंत अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने तर असे प्राणी जवळ आले तर आपण मेलो आहोत असा अभिनय करावा असा सल्ला दिला आहे. अर्थात यात काही तथ्य नाही. पण या व्हिडीओवरून शिकवण घ्यायची झाल्यास प्रत्येकाच्या मर्यादेचा मान ठेवावा असंच म्हणता येईल.