आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताने रंगतदार लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच गडी आणि दोन चेंडू राखून पराभव करत विजयी सुरुवात केली. गोलंदाजी आणि फलंदाजीच्या आघाडीवर जबरदस्त चुरस दिसून आली. या सामन्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह सुद्धा उपस्थित होते. मात्र सामना जिंकल्यानंतर जय शाह यांनी भारतीय झेंडा हातात पकडण्यास नकार दिल्याचे दृष्य कॅमेरामध्ये कैद झालं असून आता या मुद्द्यावरुन काही दाक्षिणात्य नेत्यांनी आक्षेप घेत शाह यांच्यावर टीका केली आहे.

नक्की वाचा >> IND vs PAK Asia Cup: जय शाहांमुळे संजय मांजरेकर ट्रोल; मांजरेकरांची ‘ही’ दोन विधानं ठरली कारण; अनेकांनी व्यक्त केली नाराजी

सामन्यामधील घडामोडींबरोबरच या सामन्यासाठी उपस्थित राहिलेल्या व्यक्तींसंदर्भातही सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु असल्याचं चित्र सामना सुरु असताना दिसून येत आहे. यामध्ये जय शाह यांचाही समावेश आहे. दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर सुरु असणाऱ्या सामन्यादरम्यान जय शाह हे काही स्थानिक अधिकाऱ्यांसोबत सामना पाहत असल्याचं सामन्यातील मध्यंतरापर्यंत अनेकदा दिसलं. सामन्याच्या उत्तरार्धामध्ये शाह हे भारतीय फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीवर आनंद व्यक्त करतानाही दिसले.

NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
nashik lok sabha seat, Chhagan Bhujbal, Chhagan Bhujbal Withdraws Nashik Lok Sabha, Local leaders, Local organization, mahayuti, ajit pawar ncp, bjp, eknath shinde shivsena, hemant godse, lok sabha seat 2024, election 2024,
स्थानिक पातळीवरील नकारात्मकतेमुळेच छगन भुजबळ यांची माघार
Rashtriya Janata Dal Lalu Prasad Yadav Muslim-Yadav Loksabha Election 2024 RJD Bihar List
मुस्लीम-यादवांच्या पलीकडे जाण्याचा लालूंच्या पक्षाचा प्रयत्न; राष्ट्रीय जनता दलाने कुणाला दिली उमेदवारी?
p chidambaram article the final assault on constitution
समोरच्या बाकावरून : सर्व शस्त्रांनिशी संविधानावर अंतिम हल्ला..

नक्की वाचा >> India Beat Pakistan By 5 Wickets: सामना जिंकल्या जिंकल्या PM मोदींची पोस्ट; म्हणाले, “आजच्या सामन्यात भारतीय संघाने…”

भारताने सामना जिंकल्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला. जय शाह यांनीही आधी जल्लोष केला. त्यानंतर ते टाळ्या वाजवत होते. त्याचवेळी त्यांच्या शेजारी असणाऱ्या एका सहकाऱ्याने त्यांच्या हातात तिरंगा देऊ केला. मात्र शाह यांनी ‘नो, नो’ म्हणत तिरंगा हातात घेण्यास नकार दिला आणि ते टाळ्या वाजवत राहिले. हा सर्व घटनाक्रम मैदानातील कॅमेरांमध्ये कैद झाला आणि थेट प्रक्षेपणामध्येही दिसला. आता याच मुद्द्यावरुन तेलंगण राष्ट्र समितीचे सोशल मीडिया प्रमुख असणाऱ्या कृष्णन् यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त करताना हे कृत्य भाजपा पक्षाशी संबंधित नसणाऱ्या नेत्याने केलं असतं तर काय झालं असतं अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.

नक्की पाहा >> India Beat Pakistan: हार्दिक पंड्याने विजयी षटकार लगावताच शरद पवारांनी…; सेलिब्रेशनचा खास Video सुप्रिया सुळेंनी केला शेअर

“जर ही गोष्ट भाजपाशी संबंधित नसलेल्या नेत्याने केली असती, त्याने तिरंगा हातात धरण्यास नकार दिला असता तर संपूर्ण भाजपाच्या आयटी विंगने त्या व्यक्तीला देशद्रोही म्हटलं असतं. तसेच गोदी मिडीयाने दिवसभर यावर चर्चासत्र आयोजित केली असती. मात्र नशिबाने ही व्यक्ती शेहेनशाह यांचे पुत्र जय शाह आहेत,” असा खोचक टोला कृष्णन् यांनी ट्विटरवर जय शाह झेंडा पकडण्यास नकार देत असल्याच्या व्हिडीओची क्लिप पोस्ट करत लगावला आहे.

नक्की वाचा >> IND vs PAK T20 Asia Cup: …म्हणून ऋषभ पंत भारत-पाक सामन्यातून बाहेर; मैदानातील ‘या’ अभिनेत्रीला ठरवलं जातंय दोषी

तर तेलंगण राष्ट्र समितीच्या सोशल मीडिया टीममधील अन्य एका नेत्याने, “जय शाह यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फारच प्रभाव दिसत आहे,” असा टोला हा व्हिडीओ शेअर करत लगावला आहे.

जय शाह यांनी भारतीय राष्ट्रध्वज स्वीकारण्यास नकार का दिला यासंदर्भातील नेमकं कारण अद्याप तरी समोर आलेलं नाही. दरम्यान, भारताने हा सामना जिंकत आशिया चषक स्पर्धेला विजयाने सुरुवात केली असून भारताचा पुढील सामना हाँगकाँगसोबत होणार आहे.