OMG! या चिमुकलीचा जबरदस्त स्टंट पाहून व्हाल हैराण, नेटकऱ्यांचा पालकांवर संताप!

उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली वाकून पाहणंही अनेकजण भितीपोटी टाळत असतात. मात्र या चिमुकलीने उंचीच्या सर्व मर्यादा ओलांडून हा स्टंट केलाय.

Small-Girl-Stunt-Video
(Photo: Instagram/ earthdixe)

सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या अशाच एका लहान मुलीचा व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमधील चिमुकलीचा स्टंट पाहून तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल. शेकडो फूट उंचावर बांधलेल्या लाकडी फळ्यांच्या पुलावरून एक चिमुकली चालत जाताना दिसतेय. आतापर्यंत एवढ्या उंचीवर अशा प्रकारचं साहस कुणीच केलं नव्हतं. अनेकांना उंचावरून खाली पाहिलं तरी चक्कर येते. उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली वाकून पाहणंही अनेकजण भितीपोटी टाळत असतात. मात्र या चिमुकलीने उंचीच्या सर्व मर्यादा ओलांडून हा स्टंट केलाय. या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र चिमुकलीच्या पालकांवर टिका करण्यास सुरूवात केलीय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जमिनीपासून शेकडो फूट उंचावर दोरी आणि लाकडी फळ्यांच्या मदतीने तयार केलेला एक पूल दिसून येतोय. या पूलावरून ही लहान मुलगी चालत येताना दिसून येतेय. हा स्टंट पाहिल्यानंतर कुणीही आपला श्वास रोखून धरेल. या पूलावरील फळ्यांमध्ये भरपूर अंतर आहे. तरी सुद्धा ही चिमुकली बाजुच्या दोरीवर आपले पाय ठेवत ठेवत मग फळ्यांवर येताना दिसतेय. ज्यावेळी ही मुलगी जास्त अंतर असलेल्या फळ्यांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करते ते पाहून तर मनात अगदी धडकी भरू लागते. या मुलीचा एक पाय जरी चुकीच्या जागेवर पडला किंवा घसरला तर या मुलीचं काय होईल, असा विचार मनात येऊ लागतो. पण ही मुलगी मोठ्या हुशारीने हा पूल पार करते.

आणखी वाचा : गाय पाण्यातून चालली होती, अचानक करंट लागून तडफडत जमिनीवर कोसळली आणि मग… पाहा VIRAL VIDEO

हा जीवघेणा स्टंट करत असताना मुलीच्या सुरक्षेसाठी तिच्या शरीरावर एक जॅकेट, बेल्ड आणि हातात केबल आहे. पण केवळ केबलच्या जीवावर हा इतका भयंकर स्टंट करणं हे असुरक्षितच आहे. हा व्हिडीओ earthdixe नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. आता हा व्हिडीओ का आणि कसा शूट करण्यात आला, याबाबत काही माहिती नसली तरी मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न नक्कीच आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

आणखी वाचा : ‘खूप जागा आहे, जागा नाही…’ बसमध्ये सीटसाठी दोन जणांच्या भांडणाचा हा VIRAL VIDEO पाहा

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Gay Couple Wedding: लग्नबंधनात अडकले ते दोघे ‘गे’, त्यांच्या लग्नाचे VIRAL PHOTOS एकदा पाहाच!

या व्हिडीओला आतापर्यंत २ मिलियनहून अधिक म्हणजेच २० लाख लोकांनी पाहिला आहे आणि ९९ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर आपली वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. काही नेटकऱ्यांनी असा स्टंट न करण्याचं आवाहन केलंय. तर काही नेटकऱ्यांनी मुलीच्या पालकावर आपला संताप व्यक्त केलाय. बहुतेकांनी मुलीच्या पालकांवर आश्चर्य व्यक्त केले, ज्यांनी तिला हा धोकादायक स्टंट करण्यास परवानगी दिली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video of small girl showing dangerous stunt went viral people not impressed with parenting prp

Next Story
धक्कादायक! क्रूर शिक्षकाने विद्यार्थ्याला इतकी मारहाण केली की शेवटपर्यंत Video पाहणंही अशक्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी